पूनम पांडेनं सोडलं नवऱ्याला, आता या विवाहित अभिनेत्यावर जडलंय तिचं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:49 PM2021-12-23T12:49:09+5:302021-12-23T12:49:50+5:30

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नुकतीच तिचा नवरा सॅम बॉम्बेपासून वेगळी झाली आहे.

Poonam Pandey left her husband, now her love is tied to this married actor | पूनम पांडेनं सोडलं नवऱ्याला, आता या विवाहित अभिनेत्यावर जडलंय तिचं प्रेम

पूनम पांडेनं सोडलं नवऱ्याला, आता या विवाहित अभिनेत्यावर जडलंय तिचं प्रेम

googlenewsNext

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नुकतीच तिचा नवरा सॅम बॉम्बेसोबत वेगळी झाली आहे आणि ती सिंगल आहे. लग्न झाल्यापासून त्यांच्यात काहीच ठीक नव्हते. ज्यामुळे ती नवऱ्यापासून वेगळी झाली आहे.पूनम पांडेने सांगितले की, ती पुढील काही वर्षांपासून कोणाला डेट करायचे नव्हते. पण तिला वर कसा हवा आहे, याबद्दल सांगितले.

टेली टॉकच्या रिपोर्टनुसार, पूनम पांडेने सांगितले की, मी आता ज्या काळातून गेली आहे, ज्यातून मी हळूहळू बाहेर येत आहे. मी आधीसारखी सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा पूनमला विचारले गेले की, तू सिंगल आहेस का? त्यानंतर उत्तरात पूनम म्हणाली की, मी आताही रिलेशनशीपमध्ये आहे. तेदेखील स्वतःसोबत. यात खूप मज्जा येते. ही लाइफ खूप सेक्सी आहे. मला एकटीला राहायला आवडते. पुढील ५ वर्षांपर्यंत मी सिंगलच राहीन.

पूनम पांडेचं कतरिना कैफ आहे प्रेरणास्थान
मुलाखतीत पूनम पांडेला सॅमपासून वेगळी का झाली, असे विचारण्यात आले. त्यावर तिने साधे सरळ उत्तर दिले नाही. हे सांगितले की, ती थेरेपिस्टकडे जात आहे आणि हळूहळू सर्व ठीक होत आहे. सध्या ती तिच्या कामावर फोकस करत आहे. यादरम्यान पूनमने कतरिना कैफ तिचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, लोकांचे कतरिनावर खूप प्रेम आहे. तिने इंडस्ट्रीत खूप चांगले काम केले आहे. कतरिना कैफने चांगल्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. जर मला विकी कौशल सारखा व्यक्ती मिळाला तर मी लग्न करेन.

Web Title: Poonam Pandey left her husband, now her love is tied to this married actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.