‘हाऊसफुल्ल ४’च्या सेटवरील पूजा हेगडेचा बुमरँग व्हिडीओ व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:16 IST2019-10-06T16:15:21+5:302019-10-06T16:16:19+5:30
हाऊसफुल्ल ४’ या आगामी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होणार म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच. या चित्रपटाच्या सेटवर कायम काही ना काहीतरी हॅप्पी मोमेंटस स्टारकास्ट शेअर करत असतात.

‘हाऊसफुल्ल ४’च्या सेटवरील पूजा हेगडेचा बुमरँग व्हिडीओ व्हायरल!
‘हाऊसफुल्ल ४’ या आगामी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होणार म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच. या चित्रपटाच्या सेटवर कायम काही ना काहीतरी हॅप्पी मोमेंटस स्टारकास्ट शेअर करत असतात. आता हेच बघा ना, या चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्री पूजा हेगडे हिचा एक बुमरँग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तुम्हीही पाहा खूप मजेदार आहे हा व्हिडीओ....
‘हाऊसफुल्ल ४’ हा चित्रपट यातील स्टारकास्ट आणि कथानक यांच्यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिले गाणे अशातच लाँच झाले आहे. आता पुन्हा एकदा पूजा हेगडे आणि रितेश देशमुख यांनी केलेला एक बुमरँग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओत पूजा हेगडे आणि रितेश देशमुख हे मजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओला पसंती मिळत आहे.
‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटात पूजा हेगडे हिने राजकुमारी माला ही भूमिका साकारत असून रितेश देशमुख बांगडू महाराज या भूमिकेत दिसत आहे. २६ ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.