पूजा बत्राच्या बिकनी फोटोने सोशल मीडियावर लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:30 IST2019-10-18T18:27:28+5:302019-10-18T18:30:12+5:30

पूजा सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून ती आणि नवाब तिथे हॉलिडेसाठी गेले आहेत. ते दोघे त्यांच्या हॉलिडेचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

Pooja Batra sets the temperature soaring as she flaunts her body in a white bikini | पूजा बत्राच्या बिकनी फोटोने सोशल मीडियावर लावली आग

पूजा बत्राच्या बिकनी फोटोने सोशल मीडियावर लावली आग

ठळक मुद्देपूजाने पोस्ट केलेल्या फोटोत सफेद रंगाच्या बिकनीत आपल्याला तिला पाहायला मिळत असून तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. पूजाने या फोटोत लाल रंगाचे कानातले घातले असून लाल रंगाची लिपस्टिक देखील लावली आहे.

पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर ते दोघे अनेकवेळा शेअर करत असतात. या फोटोंमध्ये अनेकवेळा आपल्याला पूजाचा हॉट अंदाज पाहायला मिळतो. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला असून या फोटोचीच सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

पूजा सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून ती आणि नवाब तिथे हॉलिडेसाठी गेले आहेत. ते दोघे त्यांच्या हॉलिडेचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता पूजाने पोस्ट केलेल्या फोटोत सफेद रंगाच्या बिकनीत आपल्याला तिला पाहायला मिळत असून तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. पूजाने या फोटोत लाल रंगाचे कानातले घातले असून लाल रंगाची लिपस्टिक देखील लावली आहे. या फोटोसाठी तिला अनेक कॉम्पिलिमेंट मिळत असून तिच्या पतीने म्हणजेच नवाबने देखील या फोटोवर हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे. 

पूजाने काही दिवसांपूर्वी देखील एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत तिने लाल रंगाची बिकनी घातली होती. तसेच या फोटोत तिच्यासोबत नवाबदेखील दिसत होता. 

पूजा बत्रा दीर्घकाळापासून अभिनेता नवाब शाहला डेट करत होती. पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात कमबॅक केले होते. पण तिला फारसे यश मिळाले नाही. या वर्षीच्या 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. 

Web Title: Pooja Batra sets the temperature soaring as she flaunts her body in a white bikini