​पुजा बत्राला लागले पुन्हा बॉलीवूडचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 12:53 IST2016-06-25T07:23:09+5:302016-06-25T12:53:09+5:30

पूजा बत्रा आवठवतेय? ‘विरासत’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कही प्यार ना हो जाए’सारख्या चित्रपटात तिने काम केलेले आहे. अनेक वर्षांपासून ...

Pooja Batla takes a look at Bollywood again | ​पुजा बत्राला लागले पुन्हा बॉलीवूडचे वेध

​पुजा बत्राला लागले पुन्हा बॉलीवूडचे वेध

जा बत्रा आवठवतेय? ‘विरासत’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कही प्यार ना हो जाए’सारख्या चित्रपटात तिने काम केलेले आहे. अनेक वर्षांपासून ही ब्युटी चंदेरी पडद्यापासून दूर आहे.

नुकतीच ती एका चित्रपटाच्या प्रीमियरला हजरी होती. तेव्हा मीडियाशी साधलेल्या संवादात सांगितले की, सध्या मिक्स मार्शल आर्ट्स शिकत असून अ‍ॅक्शन फिल्म करण्याची तिची इच्छा आहे.

अशात चित्रपटात न दिसल्याचे कारण ती सांगते की, मी सध्या हॉलीवूडमध्ये असल्यामुळे हिंदी सिनेमात काम करायला पुरेसा वेळ नाही मिळाला. नुकताच माझा ‘वन अंडर द सन’ हा चित्रपट कान्स महोत्सवात दाखविण्यात आला.

पण मी ‘एकबीसीडी २’ आणि एक पंजाबी फिल्म देखील केली आहे. चांगली कथा आणि सशक्त रोल आॅफर झाला तर मी जरूर काम करेन असेदेखील ती म्हणाली.

शेवटची ती 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘ताज महाल : अ‍ॅन इटर्नल लव्ह स्टोरी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.

Web Title: Pooja Batla takes a look at Bollywood again