सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा लाठीचार्ज; ईदच्या दिवशी गॅलक्सीच्या बाहेर नेमकं घडलं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:09 IST2024-04-12T11:06:37+5:302024-04-12T11:09:49+5:30

सलमानच्या घराबाहेर पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या (salman khan)

Police lathi charge outside Salman Khan galaxy house on eid 2024 video viral | सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा लाठीचार्ज; ईदच्या दिवशी गॅलक्सीच्या बाहेर नेमकं घडलं तरी काय?

सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा लाठीचार्ज; ईदच्या दिवशी गॅलक्सीच्या बाहेर नेमकं घडलं तरी काय?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. 'दबंग', 'वॉन्टेड', 'किसी का भाई किसी की जान', 'किक', 'सुलतान' अशा विविध सिनेमांमधून सलमानने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. सलमानवर त्याचे चाहते मनापासून प्रेम करतात. पण हेच प्रेम चाहत्यांना महागातही पडून शकतं. नुकत्याच झालेल्या ईदच्या दिवशी सलमानवर प्रेम करणाऱ्या अशाच चाहत्यांना पोलिसांचा मार खावा लागला. 

काल ईदच्या दिवशी भाईजानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी बांद्राला गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर खुप गर्दी केली होती. सलमान खान घराबाहेर येऊन आपल्याला भेटेल अशी सर्वांना अपेक्षा होती. यामुळे हजारो फॅन्स गॅलक्सीबाहेर जमा झाले होते. ही गर्दी वाढत गेली आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळात व्हिडीओमध्ये पाहता येईल की, काही महिला रस्त्यावर कोसळल्या. 

सलमान खान मात्र चाहत्यांना भेटायला घराबाहेर आला नसल्याचं समजतंय. दुसरीकडे शाहरुख खानने मात्र ईदच्या दिवशी मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाहरुख खानला पाहायला प्रचंड गर्दी जमली होती. शाहरुखने मुलगा अबरामसोबत मन्नतबाहेर येऊन सर्व चाहत्यांचं समाधान केलं. सलमान खानने काल ईदच्या दिवशी 'सिकंदर' या नव्या सिनेमाची घोषणा केली. हा सिनेमा २०२५ च्या ईदमध्ये भेटीला येणार आहे.

Web Title: Police lathi charge outside Salman Khan galaxy house on eid 2024 video viral