सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग, चावीवाल्यापासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांचा नोंदवला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:36 IST2020-06-17T15:18:10+5:302020-06-17T15:36:00+5:30
कॉस्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचे जबाब बुधवारी सकाळी नोंदविण्यात आला आहे

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग, चावीवाल्यापासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांचा नोंदवला जबाब
सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण 9 जणांचे जबाब नोंदवला आहे. या 9 लोकांमध्ये सुशांतच्या बहिणींचा देखील जबाब नोंदविण्यात आले. बहीण ऋतु सिंगचा सविस्तर जबाबनंतर घेण्यात येणार आहे. बहिणींनीशिवाय वडील कृष्णा कुमार, 1 चावीवाला, 2 मॅनेजर, जेवण करणारा यांचे जबाब घेण्यात आला आहे. कॉस्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचे जबाब बुधवारी सकाळी नोंदविण्यात आला आहे. मुकेश छाबरा 'का पो चे' चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर होता, ज्यात सुशांत मुख्य भूमिका साकारली होती.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी सुशांतच्या दोन मॅनेजरचे जबाब घेण्यात आला आहे. सुशांतच्या मॅनेजरने सांगितले की ऑक्टोबर 2019 ते जानेवारी दरम्यान त्याच्या दोनही मॅनेजर आणि सुशांतमध्ये संपर्क नव्हता. मॅनेजरने पोलिसांना सांगितले, सुशांतने आपल्या ऑफिस आणि घरामध्ये फरक नव्हता केला. तो टीम सोबतच राहायचा. परंतु दोन्ही मॅनेजरना 3 महिन्यांसाठी घरी पाठविण्यात आले (ऑक्टोबर ते जाने) होते. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार सुशांत लो फील करत होता.
सुशांतने जानेवारीत आपल्या दोन्ही मॅनेजरना बोलावून नवीन प्रोजेक्टचे काम सुरु करण्याबाबत सांगितले होते. याला Dream150 असे नाव दिले होते. याशिवाय Genuineness and Dropou असे सुशांतने आपल्या डायरीत लिहिले होते. हे प्रोजेक्ट होते का ? याची चौकशी पोलिस करतायेत. रिपोर्टनुसार, सुशांतचा बिझिनेस मॅनेजर मुंबईबाहेर आहे, ज्याला मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.