/>अक्षय कुमारसाठी यंदाचे वर्ष खास राहिले असून, त्याचे ‘एयरलिफ्ट’ ‘हाऊसफुल 3’ व ‘रुस्तम’ हे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. त्यामुळेच त्याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी 2’ कडूनही खूप अपेक्षा आहेत. वाराणसी येथे सध्या तो शुटींगमध्ये व्यस्त आहे. परंतु, सेटवर तो खूप जॉली मूडमध्ये असून, क्रिकेट खेळताना दिसत आहे. सोशल मीडीयावर त्याच्या फॅन क्लबने ही वेगवेगळी फोटो शेअर केली आहेत. हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या कॉमेडी चित्रपट जॉली एलएलबी चा सीक्कल आहे. त्यामध्ये अरशद वारसी, अमृता राव व बोमन इरानी मुख्य भूमिकेत होते. बॉक्स आॅफिसवरही या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉस मिळाला होता. जॉली एलएलबी 2 या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर आहेत. पुढील वर्षी १० फेंब्रुवारीला तो प्रदर्शित होत आहे.