अशी फसली कोयना मित्राची प्लॅस्टीक सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 18:56 IST2017-01-10T18:55:16+5:302017-01-10T18:56:24+5:30

 चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी प्लॅस्टीक सर्जरी करुन घेतल्याचे आपण पाहिलेच आहे. कॉस्मॅटिक पदधतीने शरीराची रचना बदलण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरीज करण्यात ...

Platinum Surgery of a Crop Cooney Friend | अशी फसली कोयना मित्राची प्लॅस्टीक सर्जरी

अशी फसली कोयना मित्राची प्लॅस्टीक सर्जरी

 
ित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी प्लॅस्टीक सर्जरी करुन घेतल्याचे आपण पाहिलेच आहे. कॉस्मॅटिक पदधतीने शरीराची रचना बदलण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरीज करण्यात येतात. ओठ, नाक आणि स्तन या अवयवांची प्रामुख्याने सर्वाधिक सर्जरी अभिनेत्रींनी केलेली आहे. काही अभिनेत्रींची सर्जरी चांगली झाली. तर अनेकांचे प्रयत्न फसलेले आहेत. यातच भर पडली आहे ती कोयना मित्राची. कोयनाने नुकतीच नाकाची प्लॅसिटीक सर्जरी केलेली होती. परंतू या सर्जरीनंतर कोयनाचा पूर्ण लुकच बदलला आहे. तिच्या नाकाची सर्जरी अतिशय वाईट पदधतीने करण्यात आली आहे. कोयनाचे नाक या सजर्री नंतर आधी पेक्षा फारच विचित्र झाल्याचे दिसत आहे. याविषयी एका मुलाखतीत कोयनाने सांगितले की, माझी सर्जरी खरच फसली आहे. सर्जरी नंतर माझ्याहाडांना सुज येऊ लागली होती. याविषयी मी डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले , तुला फक्त मेडिसीन आणि प्रार्थनाच वाचवू शकते आम्ही काहीच करु शकत नाही. यानंतर मला फारच वाईट वाटले. मी बरेच दिवस घरात स्वत:ला बंद करुन घेतले होते. परंतू असे किती दिवस करणार? शेवटी मी माझ्या अशा रुपातच सर्वांसमोर आले. बºयाच अभिनेत्रींची प्लॅस्टीक सर्जरी फसलेली आहे. परंतू कोयना मित्राचा संपूर्ण चेहराच यामुळे विचित्र दिसत आहे. अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत टिकण्यासाठी स्वत:चा चेहरा जास्त महत्वाचा असतो. आपण सर्वांपेक्षा जास्त सुंदर असावे असे तर त्यांना नक्कीच वाटत असते. कारण अभिनेत्रींना बºयाचदा त्यांच्या लुक्स वरुनच काम मिळते. आणि यासाठी काही अभिनेत्री आपल्या शरीराशी खेळ करुन अशा प्रकारच्या सजर्रीज करुन घेतात. या सर्जरीजचे काही विपरीत परिणाम देखील त्यांना भोगावे लागतात. पण आता कोयना मित्राच्या सर्जरी वरुन तरी सर्वांनी नक्कीच धडा घ्यावा.

Web Title: Platinum Surgery of a Crop Cooney Friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.