पहलाज निहलानी चंकी पांडेचा गॉडफादर - अक्षय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 20:54 IST2016-06-10T15:15:41+5:302016-06-10T20:54:18+5:30
‘हाऊसफुल 3’ बॉक्स आॅफिसवर हीट झाल्याचे यश साजरे करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अक्षय कुमारला ‘उडता पंजाब वि. ...

पहलाज निहलानी चंकी पांडेचा गॉडफादर - अक्षय
‘ ाऊसफुल 3’ बॉक्स आॅफिसवर हीट झाल्याचे यश साजरे करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अक्षय कुमारला ‘उडता पंजाब वि. सेन्सॉर बोर्ड’ वादाबद्दल विचाण्यात आले तेव्हा त्याने मजेशीररीत्या प्रश्नाला चंकी पांडेकडे टोलावले.
तो म्हणाला, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी चंकी पांडेचे गॉडफादर आहेत. ‘आग ही आग’ या चित्रपटातून त्यांनी चंकीला ब्रेक दिला. म्हणून या प्रश्नाचे उत्तर चंकीनेच द्यावे.
अक्षयच्या टोमण्यावर चंकी म्हणाला की, होय! निहलानी माझे गॉडफादर आहेत आणि मला त्यांच्या विषयी नितांत आदर आहे. ‘उडता पंजाब’ हा चित्रपट मी अजून पाहिलेला नाही म्हणून त्यावर मी बोलू नाही शकत. परंतु, उडत तर पोपट असतो. उडणारा पंजाब मी प्रथमच ऐकतोय.
‘उडता पंजाब’ची प्रदर्शन तारीख पुढे जाऊ शकते असे सांगितल्यावर अक्षय म्हणाला की, असे झाले तर आमच्या चित्रपटासाठी चांगलेच होईल. अशा प्रकारे हास्यविनोद करून या वादात उडी घेण्याचे टाळले.
यापूर्वीदेखील अक्षयने चंकी पांडेची मजा घेतली आहे. ‘हाऊसफुल 3’च्या एका प्रोमोशनल इव्हेंटमध्ये तो म्हणाला होता की, चंकी पांडे माझा अॅक्टिंग गुरू होता. करिअरच्या सुरुवातीला तोच मला अॅक्टिंगविषयी टिप्स द्यायचा. म्हणून मी त्याचा खूप मोठा फॅन होतो.’