‘पिंक’वर सेन्सॉर बोर्ड मेहरबान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 20:41 IST2016-08-29T15:11:08+5:302016-08-29T20:41:08+5:30
cnxoldfiles/ए सर्टिफिकेट दिले आहे. चित्रपटातील केवळ चार शब्द कापले गेले. तेही ते महिलांसाठी ‘असभ्य’ होते म्हणून. उर्वरित चित्रपटात सेन्सॉर ...

‘पिंक’वर सेन्सॉर बोर्ड मेहरबान!
cnxo ldfiles/ए सर्टिफिकेट दिले आहे. चित्रपटातील केवळ चार शब्द कापले गेले. तेही ते महिलांसाठी ‘असभ्य’ होते म्हणून. उर्वरित चित्रपटात सेन्सॉर बोर्डाला काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. सूत्रांच्या मते, सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट इतका आवडला की, महिलांवरील काही हिंसक दृश्येही बोर्डाने पास केली. जेणेकरून त्याचा प्रभाव तसूभरही कमी होऊ नये. निश्चितपणे शूजीत सरकार बोर्डाने दाखवलेल्या या ‘उदारपणामुळे’ आनंदात आहेत. ‘माझ्या चित्रपटांबद्दल सेन्सॉर बोर्ड कायम मवाळ राहत आले आहे’, असे सरकार यांनी म्हटले आहे. स्पर्म डोनेशन सारख्या संवेदनशील मुद्यांवर बनलेला ‘विक्की डोनर’ हा शूजीत सरकार यांचा चित्रपटही सेन्सॉर बोर्डाने अगदी सहजपणे पास केला होता.‘पिंक’ हा चित्रपट शहरात राहणाºया आणि समाजातील कालबाह्य विचारांवर प्रहार करणाºया तीन मुलींची कथा आहे. महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात वकीलाच्या भूमिकेत आहेत.