गुलाबी थंडीमध्ये शामक दावर घेऊन येत आहे विंटर फंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:01 IST2017-10-03T12:31:14+5:302017-10-03T18:01:14+5:30

डान्स चे गुरु म्हणून ओळखले जाणारे शामक दावर नेहमीच आपल्या नृत्यशैलीतून लोकांचं मनोरंजन करत असतात , त्याचप्रमाणे आपली नृत्यकला ...

Pink is coming with a sedative on the cold winter funk | गुलाबी थंडीमध्ये शामक दावर घेऊन येत आहे विंटर फंक

गुलाबी थंडीमध्ये शामक दावर घेऊन येत आहे विंटर फंक

न्स चे गुरु म्हणून ओळखले जाणारे शामक दावर नेहमीच आपल्या नृत्यशैलीतून लोकांचं मनोरंजन करत असतात , त्याचप्रमाणे आपली नृत्यकला सामान्य जनतेलाही शिकवत असतात . वेगवेगळ्या कलांसाठी ओळखले जाणारे अष्टपैलू शामक दावर यांनी विंटर फंक नावाने  डान्स सेशन खुलं करीत आहे . विंटर फंक २०१७ वर्कशॉप हे संपूर्ण भारतभर होत असून मुंबई मध्ये १० ऑक्टोबर पासून सुरु होत आहे . ज्यांना नृत्याची आवड आहे आणि ज्यांना शामक दावर  यांच्याकडून कला शिकायची असेल त्यांच्यासाठी हि उत्तम संधी आहे.विंटरफंक ची खासियत अशी की डान्सव्यतिरिक्त आपणाला अनेक गोष्टी शिकवण्याचा शामक यांचा मानस आहे , जसे की सतेज परफॉमन्स तांत्रिक बाबी , आत्मविश्वास वाढवणे तसेच परफॉमन्स साठी वेशभूषा आणि अन्य गोष्टीची तयारी कश्या प्रकारे करावी याचे सम्यक ज्ञान ह्या वर्कशॉप मध्ये घेता येणार आहे . विंटरफंकमध्ये सहभागी झाल्यास शामक दावरच्या आगामी ग्रॅंड शोमध्ये याच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तेव्हा येत्या ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्ही शामक स्टाईलमध्ये परफॉर्म करू शकता.गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन  केले. फॅशन डिझाइनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर ह्या पहिल्या मराठी चित्रपटातल्या एका गाण्यासाठी शामकने नृत्यदिग्दर्शन केलं होते.शामक दावर आणि विक्रम फडणीस ह्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणे, शामकसाठी चांगला अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Web Title: Pink is coming with a sedative on the cold winter funk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.