सोहा अली खानने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 17:46 IST2017-06-28T11:09:52+5:302017-06-28T17:46:47+5:30

सोहा अली खान आणि कुणाल खेमू आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोहाने नुकतेच तिच्या ट्विटर अकाऊंटवर बेबी ...

Photos of Baby Shower shared by Soha Ali Khan | सोहा अली खानने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

सोहा अली खानने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

हा अली खान आणि कुणाल खेमू आपल्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोहाने नुकतेच तिच्या ट्विटर अकाऊंटवर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी सोहाने परिधान केलेल्या पिंक कलरच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. याफोटोत ती बेबी बंप दाखवताना दिसते आहे. सोहा ही वहिनी करिना कपूरप्रमाणे प्रेग्नेंसी एन्जॉय करताना दिसते आहे. प्रेग्नेंसीमध्ये करिना कपूरने फक्त फोटोशूट केले नव्हते तर रॅम्प वॉक करत अनेकांचे लक्ष वेधले होते. वहिनीप्रमाणे सोहा प्रेग्नेंसी फोटोशूट करणार, सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावणार की यापेक्षा काही वेगळे करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.  

सोहा आणि कुणाल नुकतेच कुणालाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जाऊन आले. हा सोहाचा बेबीमूनसुद्धा होता. लंडनचे फोटो सोहाने सोशल मीडियावर शेअर केले होते. कुणालने सोहाला पॅरिसमध्ये प्रपोज केले होता. अनेक वर्ष लिव्हनमध्ये राहिल्यानंतर दोघे 2015मध्ये विवाह बंधनात अडकले होते. तैमूरच्या आगमनानंतर पौतडी खानदान सोहाच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 



अनेक दिवसांपासून सोहा मोठ्या पडद्यापासून लांब आहे तर कुणाल अजय देवगनसोबत आगामी चित्रपट गोलमालमध्ये दिसणार आहे. कुणालने काही दिवसांपूर्वी लिहिले होते मी हैदराबादमध्ये शूटिंग करतोय इक़डे मोबाईलचे नेटवर्क खूप खराब आहे. सोहाने नुकतेच योग दिनानिमित्त ट्विटर योग करतानाचे फोटो अपलोड केले होते. यावेळी तिने एक पोस्ट लिहिली होती '' फोटोग्राफर्ससाठी नव्हे तर स्वत:साठी पोज करा. योग जीवनासाठी...’ या पोस्ट द्वारे सोहाने त्या सर्वांना टोमणा मारला आहे, जे फक्त फोटोग्राफर्सना दाखविण्यासाठी योग करीत आहेत. 

Web Title: Photos of Baby Shower shared by Soha Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.