शिल्पा शेट्टीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोवर यूजर्सनी म्हटले, ‘बरं झालं जीन्स घालून गेली नाहीस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:30 IST2017-09-13T12:59:34+5:302017-09-13T18:30:22+5:30

शिल्पाने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच त्यास यूजर्सनी उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या. या फोटोवरून सध्या ती ट्रोल होत आहे.

On the photo with Shilpa Shetty's Chief Minister, the user said, 'Do not wear jeans!' | शिल्पा शेट्टीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोवर यूजर्सनी म्हटले, ‘बरं झालं जीन्स घालून गेली नाहीस’!

शिल्पा शेट्टीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोवर यूजर्सनी म्हटले, ‘बरं झालं जीन्स घालून गेली नाहीस’!

िनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या सोशल अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बघावयास मिळत आहेत. हा फोटो लखनऊमधील असून, ज्यामध्ये शिल्पा मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत स्टेजवर उभी असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशात ‘सफाईगिरी समिट अ‍ॅण्ड अवॉर्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या, त्यापैकीच एक नाव शिल्पा शेट्टीचेही होते. त्यामुळे साहजिकच या कार्यक्रमात शिल्पावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्यातच शिल्पाने एक फोटो तिच्या चाहत्यांसाठीही शेअर केला. या फोटोस तिच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने पसंती दर्शविली. परंतु त्याचबरोबर तिला काही निगेटिव्ह कॉमेण्ट्सचाही सामना करावा लागला. 
 

दरम्यान शिल्पाने, फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आदरणीय यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत एका अवॉर्ड फंक्शनमध्ये उपस्थित होते, त्यांंची आयडॉलॉजी आणि अ‍ॅटिट्यूडचे कौतुक करते.’ तसेच योगी आदित्यनाथ यांनीही शिल्पासोबतचा एक फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. शिल्पाने हा फोटो शेअर केल्यानंतर जणू काही कॉमेण्ट्सचा पूर आला. त्यातील बºयाचशा लोकांनी फोटोला निगेटिव्ह कॉमेण्ट्स दिल्या. तर काहींनी शिल्पाचे कौतुकही केले. एका यूजर्सनी लिहिले की, ‘हे आतापर्यंतचे उत्तर प्रदेशातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत.’ तर इकराम अहमद नावाच्या एका यूजरने लिहिले की, ‘बरं झालं जीन्स टी-शर्ट घालून गेली नाही, नाही तर काय झालं असतं कोणास ठाऊक’.



त्याचबरोबर काही यूजर्सनी शिल्पाला ‘संधिसाधू’ असेही म्हटले. जुनैद नावाच्या एका यूजर्सनी लिहिले की, ‘आम्हाला माहीत आहे की, मुख्यमंत्र्यांची आयडॉलॉजी काय आहे? तू संधिसाधू बनू नकोस, तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नाही.’ काही दिवसांपूर्वीच शिल्पाने चिंपाजीबरोबर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. काही वेळातच तिला हा व्हिडीओ डिलीट करावा लागला. आता पुन्हा एकदा शिल्पाला या फोटोवरून टार्गेट केले जात आहे. 

Web Title: On the photo with Shilpa Shetty's Chief Minister, the user said, 'Do not wear jeans!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.