अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 16:11 IST2017-07-12T10:32:44+5:302017-07-12T16:11:21+5:30

टीव्हीवरची नागिन मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गोल्ड चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची ...

Photo leak of Akshay Kumar and Munni Roy's film set! | अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक!

अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक!

व्हीवरची नागिन मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गोल्ड चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची चर्चा होती. त्यानंतर नुकतेच गोल्डच्या सेटवरचे फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये मौनी आणि अक्षय रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये मौनीने बंगाली साडी नेसलेली दिसत आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसते आहे. तर अक्षयने सिंपल कुर्ता घातला आहे. 
अक्षयच्या फॅन क्लबने हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. आधी अशी चर्चा होती मौनीला बॉलिवूडमध्ये सलमान खान लाँच करणार आहे.  बिग बॉसच्या मंचावर सलमान आणि मौनीच्या ओळख झाली होती. त्यानंतर सलमान मौनीचा फॅन झाला होता. आपल्या वाढदिवसाला सलमानने मौनीला खास निमंत्रण सुद्धा पाठवले होते. बिग बॉसच्या मंचावर अनेक वेळा सलमानने मौनीचे कौतुकदेखील केले होते. यानंतर सलमान मौनीला लाँच करणार हे कंफर्म झाले होते. मात्र मौनीला लाँच केले अक्षय कुमारने. मौनी रॉय टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. आता मौनीची ही क्रेझ मोठ्या पडद्यावर पण कायम राहिल का हे चित्रपट रिलीज झाल्यावर कळेलच. 


गोल्ड हा चित्रपट भारतीय हॉकी संघावर आधारित आहेत. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने तीनेळा ऑलिम्पिंकमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. याचित्रपटाची शूटिंग ब्रिटनमधल्या ब्रैडफोर्टमध्ये सुरु झाली आहे. गोल्डच्या टीमला हॉकीचे धडे भारताचे माजी कर्णधार संदीप सिंग यांनी दिले होते. अक्षय आणि मौनीसह यात कुणाल कपूर, अमित साध यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 15 ऑगस्टला 2018ला  हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: Photo leak of Akshay Kumar and Munni Roy's film set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.