​‘पेटा पर्सन आॅफ द ईअर’ने सनी लिओन सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 20:25 IST2016-12-23T20:25:49+5:302016-12-23T20:25:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिला ‘पेटा पर्सन आॅफ द ईअर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार तिला ...

'PETA Person of the Year' honored Sunny Leone | ​‘पेटा पर्सन आॅफ द ईअर’ने सनी लिओन सन्मानित

​‘पेटा पर्सन आॅफ द ईअर’ने सनी लिओन सन्मानित

ong>बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिला ‘पेटा पर्सन आॅफ द ईअर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार तिला बेवारस कुत्रे व मांजरांना वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी दिलेला पाठिंबा, कातड्यासाठी केली जाणारी हत्या व जनावरांप्रती तिच्या मनात असलेल्या संवेदना प्रकट करण्यासाठी देण्यात येण्यात येणार आहे. 

या वर्षीच्या सुरुवातीला ३५ वर्षीय सनी लिओन ही पेटाच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून तिने लोकांना जनावरांप्रती देवदूत बनण्याचा आवाहन करीत, बेवारस कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. वर्षभर तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्राण्यांचे संगोपण करण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. 

peta

पुरस्कार जाहीर करताना पेटा संस्थेचे भारतातील सचिव सचिन बंगेरा म्हणाले, सनी लिओनचा दयाळूपणा हे सिद्ध करतो की तिच्यात बाह्य सुंदरते प्रमाणेच आंतरिक सुंदरता आहे. पेटा प्रत्येक ठिकाणी लोकांकडून सनी लिओन प्रमाणे दयाळू व्हावे याचे उदाहरण देत आहे. लोकांनी सनीचे या बाबतीत अनुरसण करावे असे आम्ही आवाहन करीत आहोत. लोकांनी आरोग्याला लाभदायक असलेले अन्न ग्रहण करावे, मांसाहारापेक्षा शाकाहारावर भर द्यावा यासाठी देखील तिचे अनुसरण करावे असा आमचा प्रयत्न आहे. शाकाहार हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्राण्याचे रक्षण करणारा आहे. 

सनी लिओन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर अनेक चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेतला आहे. यातच पेटाच्या प्रमोशनल कॅम्पेनचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ‘टाईम’ मॅगझिनने जगातील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत सनी लिओनचा समावेश केला होता. नुकतेच सनीचे ‘रईस’ या चित्रपटातील ‘लैला मै लैला’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

Web Title: 'PETA Person of the Year' honored Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.