"लोकांना मला अपयशी होताना पाहायचंय", कार्तिक आर्यनने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 16:29 IST2024-12-11T16:28:29+5:302024-12-11T16:29:17+5:30
Kartik Aryan : 'भूल भुलैया ३' स्टार कार्तिक आर्यनने बॉलिवूडचा पर्दाफाश केला आहे. अभिनेता म्हणतो की इंडस्ट्रीतील लोक त्याच्या अपयशाची वाट पाहत आहेत.

"लोकांना मला अपयशी होताना पाहायचंय", कार्तिक आर्यनने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू
कार्तिक आर्यन(Kartik Aryan)ला सुरुवातीला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागला असेल पण आता तो टॉपच्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे. कार्तिकने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) या चित्रपटात तो दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने बॉलिवूड इंडस्ट्रीची काळी बाजू सांगितली आहे. तो म्हणतो की लोक त्याच्या अपयशाची वाट पाहत आहेत.
कार्तिक आर्यनने 'जीक्यू'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी एकटा योद्धा आहे. हे घर तुम्ही पाहत आहात, मी स्वतःच्या पैशाने विकत घेतले आहे. यासाठी मी वेड्यासारखे कष्ट घेतले आहेत. आणि हे इथेच संपत नाही, कारण मला माहित आहे की मी ज्या मार्गावर पुढे जात आहे, त्या इंडस्ट्रीतील कोणीही मला साथ देणार नाही. आता मी हे मान्य केले आहे की 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या एवढ्या मोठ्या यशानंतरही माझ्या पाठीशी कोणीही उभे राहणार नाही. माझ्या पुढच्या चित्रपटासाठी मला पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. इंडस्ट्रीत खूप चांगले लोक आहेत, पण असे लोकही आहेत ज्यांना मला अपयशी बघायचे आहे. पण मी अशा लोकांना खूश करू शकत नाही आणि करू इच्छित नाही. माझ्यासाठी फक्त प्रेक्षकांचा आनंद, पाठिंबा आणि प्रेम महत्त्वाचे आहे.
'भूल भुलैया ३'ने केली दमदार कमाई
कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो दिवाळीला रिलीज झालेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसला होता. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७८ कोटींहून अधिकची कमाई केली होती. 'भूल भुलैया ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाशी टक्कर देत ही कमाई केली आहे. त्याच वेळी, कार्तिक आर्यनकडे असे चित्रपट आहेत ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या चित्रपटांची घोषणा अभिनेत्याने केलेली नाही.