​लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 09:47 IST2016-12-22T20:00:10+5:302016-12-23T09:47:19+5:30

बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहम याने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समावेश असलेल्या जॉनला आजही ...

People only pay attention to my body; John Abraham's death | ​लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत

​लोक केवळ माझ्या शरीराकडे लक्ष देतात; जॉन अब्राहमची खंत

लिवूडचा हंक जॉन अब्राहम याने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समावेश असलेल्या जॉनला आजही एक खंत आहे. जॉन म्हणतो, मी जसा दिसतो तसा मी नाही. लोक माझ्या या रुपाकडे कधी पाहतच नाही. ते के वळ माझ्या शरीराला पाहतात. काही चित्रपटात तर माझ्या लूकवरच प्रेक्षकांचे लक्ष असते.

बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाºया जॉन अब्राहमला अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखले जाते.  मात्र, मला अ‍ॅक्शन स्टार म्हणून नव्हे तर एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी पहावे अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. जॉन म्हणला, अ‍ॅॅक्शन चित्रपटाव्यतिरिक्त मी वॉटर (२००५), नो स्मोकिंग (२००८), न्यूयॉर्क (२००९) या चित्रपटात संवेदनशील भूमिका केल्या आहेत.  जिंदा (२००६), नौ दो ग्याराह (२००६) या चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. स्मोकिंग या चित्रपटाला क्लासिक मानले जाते. या चित्रपटासाठी आम्ही चांगलीच मेहनत घेतली होती. लोकांना वाटले की मी केवळ त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे काम केले. काही लोकांना के वळ बहाणे हवे असतात असेही तो म्हणाला. 

People have always focussed only on my looks: John

नुकत्याच रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या ‘फोर्स २’ या चित्रपटाला नोटबंदीचा फटका बसला होता. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. यावर जॉन म्हणाला, मला याची मुळीच चिंता नाही. मी माझे काम करीत असतो. निर्माता म्हणून आता मी सुरूवात केली आहे. यात मी अभिनेता म्हणून काम करीत आहे. यापूर्वी मी ‘मद्रास कॅफे’ची निर्मिती केली होती. तो चित्रपट लोकांनी पाहिला, त्याबद्दल तरी लोकांना बोलायला हवे, असेही जॉन म्हणाला. 

जॉन अब्राहमने फोर्स फ्रेंचायसीचा फोर्स ३ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा त्याने काही दिवसांपूर्वी केली होती. 

Web Title: People only pay attention to my body; John Abraham's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.