तीनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा चढला बोहल्यावर, लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:14 IST2023-03-10T15:09:49+5:302023-03-10T15:14:25+5:30

दोघे अनेकवर्ष एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये होते. त्यावेळी अभिनेत्याच्या तिसऱ्या पत्नीने दोघांना रंगेहात पकडून मारलं होते.

Pavitra lokesh naresh vijay krishna tie the knot see photos video | तीनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा चढला बोहल्यावर, लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

तीनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा चढला बोहल्यावर, लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता विजय कृष्ण नरेश(Vijay Krishna Naresh)ने पुन्हा एकदा लग्न केले आहे. अभिनेत्याचे हे चौथे लग्न आहे, ज्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. नरेश यांनी पवित्र लोकेश (Pavitra Lokesh)सोबत सात फेरे घेतले असून, अभिनेत्रीचे हे तिसरे लग्न आहे. दोघांचे हे लग्न इतके सोपे नव्हते. नरेशची तिसरी पत्नी रम्या रघुपती हिच्यापासून त्याचा घटस्फोट होणे बाकी होते, ज्यामुळे बरेच कौटुंबिक नाटक, वाद आणि भांडणे झाली.


नरेश विजय कृष्णाने केलं चौथ लग्न 
नरेश आणि पवित्रा लोकेश यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत दोघांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांती आणि आनंदासाठी तुमचे आशीर्वाद हवेत! यासोबतच दोघांनी त्यांच्या चाहत्यांसाठी तेलुगू भाषेत एक नोटही लिहिली आहे.

नरेश दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया निर्मला यांचा मुलगा आहे. त्याने पहिले लग्न ज्येष्ठ नृत्य गुरु श्रीनू यांच्या मुलीशी केले दोघांना नवीन विजय कृष्ण नावाचा मुलगा आहे. त्यानंतर अभिनेत्याने घटस्फोट घेतला आणि प्रसिद्ध तेलगू कवी आणि गीतकार देवुलपल्ली कृष्ण शास्त्री यांची नात रेखा सुपिर्या हिच्याशी लग्न केले, या दोघांना पण तेज नावाचा मुलगा आहे.


 रेखा सुपिर्याला घटस्फोट दिला आणि राम्या रघुपतीशी लग्न केले जी त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे आणि 'KGF' चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील आणि AP राजकारणी रघुवीरा रेड्डी यांची भाची आहे. नरेशला राम्या यांना एक मुलगाही आहे. आता नरेश यांनी पवित्रा लोकेशशी चौथ्यांदा लग्न केले आहे, या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

पवित्रा लोकेशचे हे तिसरे लग्न आहे. तिने आधी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न केले होते आणि नंतर कन्नड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सुचेंद्र प्रसाद यांच्याशी लग्न केले. सुचेंद्र प्रसाद यांना दोन मुले आहेत. पवित्रा लोकेश २०२१ पासून नरेशसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती आणि शेवटी दोघांनी लग्न केले.

Web Title: Pavitra lokesh naresh vijay krishna tie the knot see photos video