Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 06:24 IST2022-12-19T06:24:06+5:302022-12-19T06:24:38+5:30

संबंधित चित्रपटातील गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादाला तोंड फुटले आहे.

Pathan Movie Controversy Complaint against Deepika padukone s saffron dress besharam rang song investigation by Sakinaka police | Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू

Pathan Movie Controversy : दीपिकाच्या भगव्या पोशाखाविरोधात तक्रार, साकीनाका पोलिसांकडून तपास सुरू

Pathan Movie Controversy : अभिनेता शाहरुख खानच्या  ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या पोशाखाविरोधात शनिवारी साकीनाका पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यावर एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.

संबंधित चित्रपटातील गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादाला तोंड फुटले आहे. त्यातील मजकुरावरून निषेध व्यक्त केला जात आहे.  अभिनेता शाहरुख खान आणि दीपिकाच्या पोशाखाच्या भगव्या रंगावर नाराजी व्यक्त केली जात आहे.  हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविलेली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Pathan Movie Controversy Complaint against Deepika padukone s saffron dress besharam rang song investigation by Sakinaka police