दीपिकाच्या ‘भगव्या’ बिकिनीचा वाद, पण शाहरुखच्या लूकची किंमत ऐकून कळेल ‘किंग’चा खरा रुबाब! जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:32 IST2022-12-16T15:30:31+5:302022-12-16T15:32:52+5:30
Shahrukh Khan, Pathaan : ‘बेशरम रंग’ या गाण्यातील शाहरूखचा लाखोंचा लुक चर्चेत...

दीपिकाच्या ‘भगव्या’ बिकिनीचा वाद, पण शाहरुखच्या लूकची किंमत ऐकून कळेल ‘किंग’चा खरा रुबाब! जाणून घ्या...
सध्या सोशल मीडियावर ‘पठान’च्या (Pathaan) ‘बेशरम रंग’ (Besharam Rang Song) या गाण्याचीच काय ती चर्चा आहे. या गाण्यावरून दोन गट पडले आहेत. काही लोकांना हे गाणं भलतंच आवडलं आहे. अनेकांनी मात्र या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेत, त्याची निंदा केली आहे. अगदी ‘पठान’वर बहिष्कार घालण्याची, हा सिनेमा रिलीज न करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या मुद्यावरून सध्या वातावरण तापलं असताना एका गोष्टीकडे कदाचित तुमचं लक्ष गेलं नसावं. होय, ती गोष्ट म्हणजे, ‘बेशरम रंग’ या गाण्यातील शाहरूखचा (Shahrukh Khan ) लाखोंचा लुक.
‘पठान’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेषत: या गाण्यात तिने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून रान माजलं आहे. पण गाण्यातील ज्या सीनवरून वातावरण पेटलंय त्या सीनमधील शाहरूखच्या लुकची सुद्धा चर्चा व्हायलाच हवी. या सीनमध्ये शाहरूखने घातलेल्या शर्टची किंमत 8 हजार 194 रूपये आहे. ब्लॅक कलर फ्लोरल प्रिंटचा शर्ट AllSaints ब्रँडचा आहे. ऑनलाईन तुम्ही हा शर्ट खरेदी करू शकता. पण तूर्तास म्हणजे ‘बेशरम रंग’ रिलीज झाल्यावर ते आऊट ऑफ स्टॉक झालं आहे.
आता किंगखानने घातलेल्य शूजच्या किमतीबद्दल बोलुयात. तर या ब्लॅक कलरच्या शर्टासोबत किंगखानने व्हाईट कलरचे Dsquared 2 Basket mid-top स्नीकर्स घातले आहेत. त्याची किंमत 1लाख 10 हजार 6778 रूपये आहे. त्याचा गॉगल. तर तो 41 हजार 210 रूपयांचा आहे. म्हणजेच किंगखानचा या सीनमधील लुक लाखो रूपयांचा आहे.
‘पठान’ या चित्रपटाद्वारे शाहरूख सुमारे चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतोय. पण चित्रपटाच्या रिलीजआधी या सिनेमाचं गाणं हेडलाइन्समध्ये आहे.