500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला ‘पठाण’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 07:51 AM2023-02-17T07:51:22+5:302023-02-17T07:51:29+5:30

तर २२व्या दिवशी ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.

'Pathan' became the first Bollywood film to collect 500 crores | 500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला ‘पठाण’

500 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला ‘पठाण’

googlenewsNext

शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत नवनवे विक्रम करताना दिसत आहे. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या पठाणने केवळ २१ दिवसांत ४९८.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर २२व्या दिवशी ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.

किती झाले पठाणचे कलेक्शन ?
शाहरुख खानच्या पठाणने केवळ २१ दिवसांतच ४९८.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट आता ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 
५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यातच आता, पठाणची टक्कर बाहुबली २ सोबत 
आहे. ज्याचे कलेक्शन ५११ कोटी रुपये एवढे आहे.

२१ दिवस ४९८.८५ कोटींचा गल्ला

22 व्या दिवशी ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील

शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट्स
 शाहरुख खानच्या पठाणने धमाका केला आहे. पठाणनंतर आता शाहरुख खान, ‘डंकी’ आणि ‘जवान’मध्येही दिसणार आहे. 
 राजकुमार हिरानीचा चित्रपट डंकीमध्ये शाहरुख खानची जोडी तापसी पन्नूसोबत असेल. 
 या दोन्ही चित्रपटांशिवाय शाहरुख, दिग्दर्शक ॲटलीसोबतही जवान या चित्रपटात दिसेल.

Web Title: 'Pathan' became the first Bollywood film to collect 500 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.