Pathaan: तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 18:27 IST2023-02-13T18:20:02+5:302023-02-13T18:27:56+5:30
पठाण' (Pathaan)चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. 'पठाण' हा हिंदी सिनेसृष्टीतील जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Pathaan: तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची जादू कायम, ठरला जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
Pathaan Worldwide Collection: शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटूनही बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या स्पाय थ्रिलर 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे 'पठाण' चित्रपट कमाईच्या बाबतीत रोज नवनवीन विक्रम करत आहे. बॉक्स ऑफिसवर ताबडतोब कमाई करणाऱ्या 'पठाण'ने जगभरात रेकॉर्डब्रेक कलेक्शनही केले आहे.
'पठाण'ने जगभरात केलं रेकॉर्डब्रेक कलेक्शन
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने रिलीजच्या 19 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. 'पठाण' आजही चाहत्यांची पहिली पसंती आहे. त्यामुळे 'पठाण'चे कलेक्शन दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यशराज फिल्म्सने सोमवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'पठाण'च्या 19 व्या दिवशी जगभरातील कलेक्शनची माहिती दिली आहे.
यशराज फिल्म्सने सांगितले की- शाहरुख खान स्टारर चित्रपट 'पठाण'ने आतापर्यंत जगभरात 946 कोटींचा बंपर कमाई केली आहे. यासह 'पठाण' आता जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.
Witness the rollercoaster ride of action and entertainment as it roars across theatres! #Pathaan Book your tickets - https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
— Yash Raj Films (@yrf) February 13, 2023
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/hEE7YJzhKx
यशराज फिल्म्सकडून असेही सांगण्यात आले आहे की 'पठाण' चित्रपटाने परदेशात 358 कोटींचे धमाकेदार कलेक्शन केले आहे. त्याच वेळी, भारतातील सर्व भाषांमध्ये 588 कोटी जमा केले आहेत. तर बॉक्स ऑफिसवर पठाणचे एकूण कलेक्शन 489 कोटींवर गेले आहे. खर्या अर्थाने शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट आता ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला आहे.