परिणीती-सुशांतच्या ‘ताकादुम’चे शूटिंग स्टार्ट्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 12:44 IST2016-10-19T12:44:39+5:302016-10-19T12:44:39+5:30

सुशांतचा ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट  बॉक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवतोय. महेंद्रसिंग धोनीचा सुशांतसिंगने केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. ...

Parineeti-Sushant's shooting starts at 'Takadum' | परिणीती-सुशांतच्या ‘ताकादुम’चे शूटिंग स्टार्ट्स...

परिणीती-सुशांतच्या ‘ताकादुम’चे शूटिंग स्टार्ट्स...

शांतचा ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट  बॉक्स आॅफिसवर चांगलाच गल्ला जमवतोय. महेंद्रसिंग धोनीचा सुशांतसिंगने केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ परिणीती चोप्राच्या ‘जानेमन आह’ या  गाण्यातील अभिनयावर चाहते फिदा झाले.

‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटात सुशांतसिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा यांची केमिस्ट्री आठवतेय ना? ते दोघे एकमेकांसोबत फारच कम्फर्टेबल असतात. आता लवकरच अशी केमिस्ट्री एका आगामी चित्रपटात पहावयास मिळणार आहे. माहितीये का कुठल्या चित्रपटात ते?

होय, ‘ताकादुम’ हा त्यांचा आगामी चित्रपट असून ते दोघे यात पुन्हा एकदा जुन्या केमिस्ट्रीसह दिसणार आहेत. ‘मेरी प्यारी बिंद्’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या परिणीती व्यस्त असून तिने सुशांतसोबतचा एक फोटो टिवटरवर शेअर केला आहे. ‘इट बिगिन्स. सो एक्साईटेड फॉर धीस न्यू जर्नी! रिडींग विथ माय मॅन.’ 

Web Title: Parineeti-Sushant's shooting starts at 'Takadum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.