Parineeti-Raghav Wedding: प्रियंका चोप्राची परिणीतीसाठी खास पोस्ट, बहिणीच्या लग्नात सहभागी नाही होणार मिमी दी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 11:14 IST2023-09-23T11:14:04+5:302023-09-23T11:14:30+5:30
Priyanka Chopra Post :अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिची धाकटी बहीण परिणीतीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Parineeti-Raghav Wedding: प्रियंका चोप्राची परिणीतीसाठी खास पोस्ट, बहिणीच्या लग्नात सहभागी नाही होणार मिमी दी?
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. लग्नात सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईक उदयपूरला पोहोचले आहेत. अशी एक व्यक्ती आहे जिची प्रत्येकजण वाट पाहत आहे आणि ती म्हणजे परिणीतीची मिमी दी म्हणजेच प्रियांका चोप्रा. लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांका अद्याप भारतात आलेली नाही. प्रियांकाने सोशल मीडियावर तिची पोस्ट शेअर करून तिच्या धाकट्या बहिणीचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर असे दिसते आहे की प्रियांका लग्नाला येणार नाही आणि ती सध्या अमेरिकेत आहे.
प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर परिणीतीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या बहिणीचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मोठ्या दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असाल...नेहमी खूप प्रेम . फोटोमध्ये परिणिती हातात ग्लास घेऊन वावरताना दिसत आहे.
प्रियांका लग्नात होणार नाही सहभागी?
प्रियांका चोप्राच्या या पोस्टनंतर ती परिणीतीच्या लग्नाला उदयपूरला येऊ शकणार नसल्याची अटकळ बांधली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका मुलगी मालतीसोबत लग्नाला येणार असल्याचं बोललं जात होतं. निक जोनास येऊ शकणार नाही. मात्र आता प्रियांकाच्या टीमने याबाबत मौन पाळले असून अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
मुलीसोबतचा शेअर केला व्हिडिओ
प्रियांका चोप्राने आज सकाळी मुलगी मालतीसोबत शेतात मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही प्राण्यांसोबत दिसत आहेत.
प्रियांकाची आई होणार सहभागी
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा परिणीती-राघवच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळीच ती उदयपूरला पोहोचली होती.