काय म्हणता? अॅक्टिंग सोडून नोकरी करणार परिणीती चोप्रा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:00 IST2019-09-29T15:00:00+5:302019-09-29T15:00:02+5:30
म्हणायला परिणीती बिझी आहे. पण तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत.

काय म्हणता? अॅक्टिंग सोडून नोकरी करणार परिणीती चोप्रा!!
बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. पण दुर्दैवाने तिचे करिअर म्हणावे मार्गी लागलेले नाही. म्हणायला परिणीती बिझी आहे. पण तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. अलीकडे परिणीतीचा ‘जबरिया जोडी’ रिलीज झाला. पण तोही दणकून आपटला. अशात आता परिणीती चित्रपट सोडून नोकरी करू इच्छित आहे. आश्चर्य वाटले ना? पण घाबरू नका. कारण न्यूज में ट्विस्ट है...
त्याचे झाले असे की, एक नावाजलेले पिज्जा रेस्टॉरंट चेन त्यांचा गार्लिक ब्रेड पिज्जा टेस्ट करण्यासाठी हायरिंग करत आहे. गार्लिक ब्रेड टेस्टर हवेत, अशी पोस्ट नुकतीच या रेस्टॉरंटने केली. परिणीतीची नजर या पोस्टवर गेली आणि तिने लगेच कमेंट केली.
होय, ‘क्या मैं अप्लाई कर सकती हूं,’ असे तिने लिहिले. एवढेच नाही तर गेल्या सहा महिन्यांपासून चांगला पिज्जा खाल्लेला नाही. त्यामुळे हीच उत्सुकता आहे, हेही तिने सांगितले. साहजिकच परिणीतीच्या या कमेंटवर अनेकांनी मजेशीर रिप्लाय दिलाय.
सध्या परिणीती ‘द गर्ल ऑन दि ट्रेन’ चित्रपटात बिझी आहे. तिचा हा आगामी चित्रपट हॉलिवूड चित्रपट द गर्ल ऑन दि ट्रेनचा हिंदी रिमेक आहे.
पॉल हॉकिन्सची प्रसिद्ध कादंबरी ‘द गर्ल ऑन द ट्रेन’वर बनलेला अभिनेत्री एमिली ब्लंटवर चित्रीत झालेला हॉलिवूडपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा हिंदी रिमेक बनत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला.