लाल केसांमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली परिणीती चोप्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 11:15 IST2018-08-31T11:13:52+5:302018-08-31T11:15:25+5:30

अगदी अलीकडे एका ड्रेसने परिणीतीची फजिती केली होती. या ड्रेसवरून युजर्सनी परिणीतीला ट्रोल केले होते. आता परी तिच्या केसांच्या रंगामुळे ट्रोल होतेय.

parineeti chopra troll again for her red hairstyle | लाल केसांमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली परिणीती चोप्रा!

लाल केसांमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली परिणीती चोप्रा!

    परिणीती चोप्रा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अगदी अलीकडे एका ड्रेसने परिणीतीची फजिती केली होती. या ड्रेसवरून युजर्सनी परिणीतीला ट्रोल केले होते. आता परी तिच्या केसांच्या रंगामुळे ट्रोल होतेय. होय, अलीकडे परिणीती लाल रंगांच्या केसांमध्ये दिसली. म्हणजेच, तिने केस लाल रंगात केस रंगवलेले दिसले. पण तिचा हा नवा लूक पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला बरेच काही ऐकवले. काहींनी तिची तुलना कॅटरिना कैफच्या ‘फितूर’मधील लूकशी केली. एका युजरने थेटपण कॅटरिना शोभलं, पण तुला शोभत नाही, असे परिणीतीला सुनावले. या परिणीतीला झालेयं तरी काय? असा सवाल करत, एका युजरने तिला लक्ष्य केले.


अर्थात परिणीतीला या प्रतिक्रियांमुळे काहीही फरक पडला नाही. या लाल रंगाच्या केसांबद्दल छेडले असता, परिणीतीने काही वेगळाच खुलासा केला. होय, माझे लाल केस हे ‘जबरियां जोडी’ यासाठी केलेला एक प्रयोग होता. मला काहीतरी वेगळे करायचे होते़ त्यामुळे चित्रपटाच्या निर्माती रूचिकाने मला केस लाल करण्याचा सल्ला दिला. मला ही कल्पना आवडली आणि मी केस रंगवले. पण केस रंगवणे सोपे काम नाही, हे मला नंतर कळले. या केसांची प्रचंड काळजी घ्यावी लागते. खरोखरचं लोकांमध्ये खूप संयम आहे, हे मला कळले.

Web Title: parineeti chopra troll again for her red hairstyle