OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 12:05 IST2019-03-13T11:49:49+5:302019-03-13T12:05:27+5:30

परिणीती चोप्रा सध्या आपला आगामी सिनेमा केसरीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये परिणीती कोणतीच कसर सोडत नाही आहे.

Parineeti chopra speakes about her marriage after priyanka chopda | OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय

OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय

ठळक मुद्दे'केसरी'मध्ये परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहेयेत्या २१ मार्चला केसरी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

परिणीती चोप्रा सध्या आपला आगामी सिनेमा केसरीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये परिणीती कोणतीच कसर सोडत नाही आहे. नुकेतच मीडियाशी बोलताना परिणीतीने तिच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला.  


परिणीतीला ज्यावेळी मोठी बहीण प्रियंका चोप्रा आणि निक जोनसाच्या लग्नाबाबत विचारण्यात आला यावर तिने खूप मजेदार पद्धतीने उत्तर दिले. परिणीती म्हणाली, प्रियंकाने 36 व्या वर्षी लग्न केले आणि घाईघाईत ती लग्नाच्या बंधनात अडकली (हसत-हसत).माझ्याकडे अजून सहा वर्ष आहेत. माझा सध्या लग्नाचा कोणताच प्लॅन नाही आहे. मी सध्या लग्नासाठी स्वत: तयार नाही आहे.'' प्रियांका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती दिग्दर्शक चरित देसाईशी लग्न करेल अशी चर्चा सुरु होती.       


केसरीमध्येपरिणीती चोप्रा आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे.  १८९७ साली झालेल्या सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर ‘केसरी’ आधारित आहे.ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी लढणा-या ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या शौर्याची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंगने १० हजार अफगाणी सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसºया वेळेस त्याचा पराभव झाला पण  ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते.  येत्या २१ मार्चला केसरी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Parineeti chopra speakes about her marriage after priyanka chopda