लग्नानंतर पतीशिवाय परिणीती चोप्रा पोहोचली मालदीवला, म्हणाली, "हनिमून नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:11 IST2023-10-16T13:07:03+5:302023-10-16T13:11:29+5:30

मग परिणीती कोणासोबत गेली असा प्रश्न पडला असेल.

parineeti chopra reached maldives without husband raghav chadha says she is on girls trip | लग्नानंतर पतीशिवाय परिणीती चोप्रा पोहोचली मालदीवला, म्हणाली, "हनिमून नाही तर..."

लग्नानंतर पतीशिवाय परिणीती चोप्रा पोहोचली मालदीवला, म्हणाली, "हनिमून नाही तर..."

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) नुकतीच लग्नबंधनात अडकली. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chaddha) यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये रॉयल अंदाजात हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर परिणीती आणि राघव चड्डा हनिमूनला जातील असं अनेकांना वाटलं असेलच. पण काहतरी भलतंच घडलं आहे. परिणीती मालदीवला पोहोचली आहे तेही राघव चड्डा यांच्याशिवाय. नक्की काय झालं बघा

परिणीती दोन दिवसांपूर्वीच एका फॅशन सोहळ्यात दिसली होती. तिने ब्रायडल लेहेंग्यात रॅम्पवॉकही केला. भांगेत सिंदूर, गोल्डन रंगाचा भरजरी लेहेंगा या लुकमध्ये परिणीती सुंदर दिसत होती. तर आता नुकतेच तिने मालदीवला पोहोचल्याचे फोटो शेअर केलेत. इन्स्टाग्रामवर तिने हॉटेल आणि बीचवरील नजारा कॅमेऱ्यात कॅप्चर केला आहे. त्यामुळे परिणीती हनिमूनला गेली असाच अंदाज सुरुवातीला चाहत्यांनी लावला. मात्र तिने कॅप्शनमध्ये 'हनिमूनला आलेले नाही' असा खुलासा केला.

मग परिणीती कोणासोबत गेली असा प्रश्न पडला असेल. तर ती तिच्या मैत्रिणींबरोबर मालदीवला हॉलिडे एन्जॉय करत आहे. होय, लग्नानंतर परिणीती पतीशिवाय मालदीवला पोहोचली आहे. 'हॅशटॅग गर्ल्स ट्रीप' असं कॅप्शनही तिने दिलं आहे.

यावर्षी २४ सप्टेंबरला परिणीती आणि राघव चड्डा लग्नबंधनात अडकले. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये या ग्रँड वेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नानंतर दोघांनी वर्क कमिटमेंट्स आणि श्राद्ध पक्षमुळे हनिमूनचा प्लॅन पुढे ढकलला असल्याची बातमी आली. यामुळेच त्यांनी रिसेप्शनही रद्द केल्याची चर्चा होती. मात्र अद्याप दोघांकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता परिणीती राघव यांना सोडून मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे.

Web Title: parineeti chopra reached maldives without husband raghav chadha says she is on girls trip