Parineeti Raghav Photos: परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या हळदी सेरेमनीचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 16:44 IST2023-09-29T16:39:15+5:302023-09-29T16:44:49+5:30
परी आणि राघव यांच्या हळदी फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Parineeti Raghav Photos: परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या हळदी सेरेमनीचा फोटो व्हायरल
राघव चड्ढा (Raghav Chaddha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांनी २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली. उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उदयपूरमध्ये झालेल्या या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
लग्नातील काही मोजकेच फोटो परिणीतीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. आता त्यांच्या हळदी फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे कपल एकत्र बसून लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे.
परिणीतीने तिच्या हळदीला गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, यात ती खूप सुंदर दिसत होती. या ड्रेससोबत तिने मॅचिंग एथनिक जॅकेटही घातलं होतं. अभिनेत्रीने शीश पट्टी आणि मोठ्या इयररिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला. फोटोमध्ये राघवही परिणीतीसोबत बसलेला दिसत आहे. त्यांनी कुर्ता-पायजमा आणि गॉगल घातलेला दिसतोय.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा सध्या त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार परी आणि राघव चड्ढा यांचा हनीमूनला जाण्याच्या कोणत्याच प्लानचं नियोजन नाही केलंय. दोघे कदाचित हनीमूनला जाणार नाहीत. दोघेही आपल्या राहिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहेत. परिणीती दिल्ली सासरी क्वॉलिटी टाईम स्पेंट केल्यानंतर मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यावर ती आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. 'मिशन रानीगंज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये परिणीती बिझी असणार आहे.