परिणीती-राघवच्या रिसेप्शन प्लानमध्ये झाला मोठा बदल, आता फक्त या ठिकाणी होणार पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:05 IST2023-09-27T12:28:50+5:302023-09-27T13:05:54+5:30
लग्नानंतर परिणीती आणि राघव लवकरच त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत.

परिणीती-राघवच्या रिसेप्शन प्लानमध्ये झाला मोठा बदल, आता फक्त या ठिकाणी होणार पार्टी
राघव चड्ढा (Raghav Chaddha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांनी २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली. उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उदयपूरमध्ये झालेल्या या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान आणि आदित्य ठाकरे परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला उपस्थिती होते.
लग्नानंतर परिणीती आणि राघव लवकरच त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार अशी चर्चा होती. दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत, तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्स पाहायला मिळणार आहेत. मात्र आता प्लॅन बदलण्यात आला आहे. आता फक्त मुंबईतचं रिसेप्शन होणार आहे. परिणीती आणि राघव मुंबईत त्यांच्या मित्रांसाठी पार्टी देणार आहेत. ही पार्टी 4 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.
परिणीतीची बहिण प्रियंका चोप्राही या लग्नाला हजर राहू शकली नव्हती. प्रियंकाची आई मधु चोप्रा यानी प्रियंका काम करत होती त्यामुळे ती येऊ शकली नाही असे सांगितलं होतं. मे महिन्यात परिणीती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला प्रियंका कुटुंबासह हजर होती. तसेच या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.