-अन् अफवांमुळे संतापली परिणीती चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:13 IST2018-10-31T14:13:06+5:302018-10-31T14:13:27+5:30
होय, परिणीतीचा संयम सुटला आणि ती चांगलीच खवळली. सोशल मीडियावर तिने आपला संताप बोलून दाखवला.

-अन् अफवांमुळे संतापली परिणीती चोप्रा
परिणीती चोप्राचा अलीकडे प्रदर्शित झालेला ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट दणकून आपटला. बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची चांगलीच दयनीय अवस्था झाली. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटातील परिणीती आणि अर्जुन कपूरच्या अभिनयावर व आॅनस्क्रीन केमिस्ट्रीवरही लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. अशातचं आणखी एक बातमी आली, ती म्हणजे, अनुराग बासू यांच्या ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमधून परिणीती बाहेर पडल्याची. काहींनी तर या चित्रपटातून परिणीतीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, असेही म्हटले. यात भरीस भर म्हणजे, या बातम्या वाचून अनुराग बासूंनी एक वेगळेच टिष्ट्वट केले. ‘बाहेर पडली? ती या चित्रपटात होतीचं कधी?’, अशी पोस्ट अनुराग बासूंनी टाकली. या सर्वांचा परिणाम एकच झाला. तो म्हणजे, या सगळ्यांमुळे परिणीतीचा संयम सुटला आणि ती चांगलीच खवळली. होय, सोशल मीडियावर तिने आपला संताप बोलून दाखवला. ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या टीमलाही अप्रत्यक्षपणे तिने लक्ष्य केले. ‘मित्रांनो, काहीही तर्क काढू नका. मी कुठला चित्रपट करतेय, याची घोषणा मी स्वत: करेल. हे अतिशय अपमानास्पद आणि खराब पीआर आहे. मी कुठल्याही चित्रपटातून बाहेर पडलेली नाही,’ असे परिणीतीने लिहिले.
दीर्घकाळापासून परिणीतीने यशाची चव चाखलेली नाही. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल 4’च्या अपार यशानंतर परिणीतीच्या करिअरची गाडी रूळावरून आली, असे अनेकांना वाटले होते. आधी ‘मेरी प्यारी बिंदू ’ आणि आता ‘नमस्ते इंग्लंड’ या दोन्ही चित्रपटाच्या अपयशाने परिणीतीला कदाचित चिंतेत टाकले आहे. येत्या काळात अक्षय कुमारच्या ‘केसरी’मध्ये परी दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘जबरिया जोडी’ आणि अर्जुन कपूरसोबत ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.