परिणीती चोप्राने 'चमकीला'साठी वाढवलं १५ किलो वजन, आता जिममध्ये गाळतेय घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:01 IST2023-12-04T18:01:37+5:302023-12-04T18:01:56+5:30
Parineeti Chopra : लग्नानंतर परिणीती चोप्रा अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज' चित्रपटात दिसली आणि लवकरच ती इम्तियाज अलीच्या 'चमकीला' चित्रपटात दिसणार आहे.

परिणीती चोप्राने 'चमकीला'साठी वाढवलं १५ किलो वजन, आता जिममध्ये गाळतेय घाम
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा(Parineeta Chopra)ने नुकतेच आप पक्षाचे नेते राघव चढ्ढासोबत लग्न केले. लग्न झाल्यापासून ती चर्चेत राहिली आहे. लग्नानंतर ही अभिनेत्री अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज' चित्रपटात दिसली आणि लवकरच ती इम्तियाज अलीच्या 'चमकीला' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी परिणीतीने 'चमकिला'साठी १५ किलो वजन वाढवल्याचा खुलासा केला आहे.
'चमकीला' चित्रपटासाठी वजन वाढवल्यानंतर परिणीती चोप्रा आता जिममध्ये घाम गाळून वजन कमी करत आहे. जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गेल्या वर्षी मी रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये ६ महिने गाण्यात घालवले आणि 'चमकीला'साठी १५ किलो वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जंक खाण्यासाठी घरी परतलो!
'मला स्टुडिओची आठवण येते...'
परिणीतीने पुढे लिहिले की, 'संगीत आणि अन्न. असा माझा दिनक्रम होता. आता हा चित्रपट बनल्याने स्टोरी उलट झाली आहे. मला स्टुडिओची आठवण येते आणि मी पुन्हा माझ्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करण्यासाठी जिममध्ये कसरत करते. आणि अमरजोत जी सारखे नाही! अवघड झाले आहे. पण इम्तियाज सर तुमच्यासाठी काहीही! आणि हा रोल. अजून काही इंच घटवायचे आहेत.
'चमकिला' नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
परिणीती चोप्रा 'चमकिला' चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. दिलजीत अमर सिंग 'चमकिला'ची भूमिका साकारणार आहे, तर परिणीती त्याच्या पत्नी अमरजोतची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.