Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
By कोमल खांबे | Updated: October 19, 2025 16:34 IST2025-10-19T16:34:20+5:302025-10-19T16:34:46+5:30
बॉलिवूडमधून एक गुडन्यूज आली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आईबाबा झाले आहेत. चड्ढा कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
बॉलिवूडमधून एक गुडन्यूज आली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आईबाबा झाले आहेत. चड्ढा कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. परिणीतीने आज (१९ ऑक्टोबर) गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत परिणीती आणि राघव यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. काही वेळापूर्वीच परिणीतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
परिणीती चोप्राने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. परिणीती आणि राघव चड्ढा यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. "याआधीच आयुष्य आम्हाला आठवत नाही...पहिलं आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे", असं म्हणत परिणीती आणि राघव यांनी मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचं सांगितलं होतं. आता चिमुकल्याच्या आगमनाने दोघांच्याही कुटुंबात आनंद साजरा होत आहे.