मुहूर्त ठरला! याच महिन्यात परिणीती चोप्राचा होणार राघव चड्ढांसोबत साखरपुडा, जाणून घ्या एंगेजमेंटची डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 17:31 IST2023-05-02T16:54:39+5:302023-05-02T17:31:54+5:30
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. तरी या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही आली आहे.

मुहूर्त ठरला! याच महिन्यात परिणीती चोप्राचा होणार राघव चड्ढांसोबत साखरपुडा, जाणून घ्या एंगेजमेंटची डिटेल्स
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. काही वेळापूर्वी परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा एकत्र लंच आणि डिनरसाठी. जरी या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही. या सगळ्या दरम्यान या कपलच्या एंगेजमेंटची तारीखही समोर आली आहे. जाणून घेऊया परिणीती आणि राघव एकमेकांना एंगेजमेंट रिंग कधी घालणार आहेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव या आठवड्यात म्हणजे १३ मे रोजी एंगेजमेंट करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव एका इंटिमेट रिंग सेरेमनीनंतर त्यांच्या नात्याला अधिकृत करतील. या एंगेजमेंट फंक्शनमध्ये फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव 13 मे रोजी एंगेजमेंट करणार आहेत. त्यांच्या एंगेजमेंटचे विधी दिल्लीत होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यापूर्वी अशी बातमी आली होती की परिणीती आणि राघवचा रोका सेरेमनी पार पडली असून ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.
रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की प्रियांका चोप्रा ऑक्टोबरमध्ये लग्नाला उपस्थित राहू शकते कारण ती त्याच वेळी Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येणार आहे. राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत