परिणिती चोपडाला ‘हे’ काम करायला खूपच आवडते, जाणून घ्या!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 20:01 IST2017-09-13T14:11:39+5:302017-09-13T20:01:27+5:30
अभिनेत्री परिणिती चोपडाचे म्हणणे आहे की, तिला दर दोन महिन्याने नव्या देशाची सहल करायला आवडते. परिणितीने आयएएनएसला सांगितले की, ...

परिणिती चोपडाला ‘हे’ काम करायला खूपच आवडते, जाणून घ्या!!
अ िनेत्री परिणिती चोपडाचे म्हणणे आहे की, तिला दर दोन महिन्याने नव्या देशाची सहल करायला आवडते. परिणितीने आयएएनएसला सांगितले की, ‘खरं सांगायचे झाल्यास मला प्रवास करायला खूप आवडते. मी खूप भटकंती करते. प्रत्येक वर्षी किमान ४ ते ५ देशांची सहल करते. मी दर दोन महिन्याला नव्या देशाच्या सहलीवर जाते. खरं तर प्रवास करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. परिणितीला आॅस्ट्रेलियामध्ये पर्यटनला प्रोत्साहन देण्यासाठी ‘फ्रेंड आॅफ आॅस्ट्रेलिया’ (एफओए) पॅनलमध्ये पहिली भारतीय महिला अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
सध्या परिणिती क्वीन्सलॅण्ड येथे सुट्या एन्जॉय करीत आहे. परिणितीने ब्रिस्बेन येथून तिच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी तिने लोन पायन कोआला अभयारण्याला भेट दिली. परिणितीने ब्रिस्बेन येथील साउथबॅँक पार्क लॅण्ड येथून तिच्या सहलीला सुरुवात केली. यावेळी तिने प्रवासादरम्यान अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तसेच अल्केमी रेस्तरां आणि बारमध्येही पोहोचली होती. या प्रवासाची काही छायाचित्रे तिने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. वास्तविक परिणिती नेहमीच तिच्या प्रवासादरम्यानची छायाचित्रे सोशल साइटवर अपलोड करीत असे.
असो, परिणितीच्या अभिनयाविषयी सांगायचे झाल्यास, सध्या ती ‘गोलमाल अगेन’मध्ये काम करीत आहे. चित्रपटात अजय देवगण, अरशद वारसी, कुणाल खेमू, तब्बू, नील नितीन मुकेश आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक कॉमेडीपट असून, त्याचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करीत आहे. दरम्यान, ‘गोलमाल’ सीरिजचा भाग झाल्यामुळे परिणिती आनंदी असून, ती सध्या या टीमसोबत खूप धमाल करीत आहे. या चित्रपटाचा भाग बनण्यापूर्वीच तिने स्पष्ट केले होते की, गोलमाल अगेनमध्ये मी खूप धमाल करणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे.