बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘हेरा फेरी 3’बद्दल अत्यंत मोठे अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:06 PM2023-10-23T12:06:05+5:302023-10-23T12:17:35+5:30

'हेरा फेरी ३' च्या शूटिंगला लवकच सुरुवात होणार असल्याची माहिती परेश रावल यांनी दिली आहे. 

Paresh Rawal said Shooting of Hera Pheri 3 will start in March-April next year | बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘हेरा फेरी 3’बद्दल अत्यंत मोठे अपडेट

बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘हेरा फेरी 3’बद्दल अत्यंत मोठे अपडेट

 हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे. 'हेरा फेरी ३' च्या शूटिंगला लवकच सुरुवात होणार असल्याची माहिती परेश रावल यांनी दिली आहे. 

एका मुलाखतीमध्ये परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ''हेरा फेरी' सिक्वेल कधी रिलीज होणार?. या प्रश्नाला परेश यांनी उत्तर दिलं, ‘हेरा फेरी ३’ चे शुटिंग मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल. पण त्याआधी 'वेलकम टू द जंगल' बनत आहे. हा देखील खूप महागडा चित्रपट आहे. त्याचे शूटिंग सौदी अरेबियात होणार आहे'.  आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार,  'फिर हेरा फेरी' सिनेमाची कथा जिथे संपली, त्याच्या पुढे 'हेरा फेरी ३' ची सुरू होणार आहे. राजू, श्याम आणि बाबूराव ही तीन पात्र बंदूक आणि माफियांच्या कचाट्यात अडकताना दिसतील. 'हेरा फेरी ३' मध्ये एका नवीन पात्राची भर पडली असून त्यात संजय दत्त गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षयला हेरा फेरी ३ सिनेमाची पटकथा आवडली नसल्यानं यातून त्यानं काढता पाय घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनला हा राजू ची भूमिका साकारणार अशी चर्चा सुरु झाली होती.  पण रिपोर्टनुसार, आता 'हेरा फेरी 3'  मध्ये राजू ही भूमिका अक्षय कुमारचं साकारणार आहे. 

हेरा फेरीचा तिसरा भाग येणार म्हणून चाहते खूष आहेत. हेरा फेरी 2000 मध्ये रिलीज झाला होता तर फिर हेरा फेरी २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला हेरा फेरी येऊन २२ वर्ष झाली मात्र सिनेमाची क्रेझ अजुनही कायम आहे. आता पुन्हा एकदा बाबू भैय्या, राजू आणि श्याम हे तिघेही पुन्हा चाहत्यांना हसवायला येत आहेत.

Web Title: Paresh Rawal said Shooting of Hera Pheri 3 will start in March-April next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.