"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:31 IST2025-07-22T12:23:23+5:302025-07-22T12:31:46+5:30
परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ची लघवी प्यायलाचा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. यावर आता प्रतिक्रिया देत परेश रावल यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये विविधांगी आणि दमदार भूमिका साकारून परेश रावल यांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. कधी कॉमेडी तर कधी गंभीर भूमिका साकारताना दिसले. परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ची लघवी प्यायलाचा धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. यावर आता प्रतिक्रिया देत परेश रावल यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
"मी त्यांना लघवी दिली नाही. म्हणून त्यांना काही प्रॉब्लेम असेल का? की त्यांना असं वाटत असेल की अरे हा तर एकटाच लघवी प्यायला आम्हाला दिली नाही", असं म्हणत परेश रावल यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. पुढे ते म्हणाले, "ही माझ्या जीवनातील एक घटना आहे. जी ४० वर्षांपूर्वी घडली होती. ती मी सांगितली तर त्यात काय एवढं? पण लोकांना राईचा पर्वत करण्यात मजा येते. त्यांना मजा घेऊ दे".
काय म्हणाले होते परेश रावल?
परेश रावल आजारी असताना अजय देवगणच्या वडिलांनी त्यांना स्वत:चीच लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. "वीरु देवगण यांचा सल्ला ऐकून पुढील १५ दिवस परेश रावल बिअरसारखी स्वतःची लघवी प्यायचे. १५ दिवसांनंतर जेव्हा एक्स रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर तो रिपोर्ट बघून आश्चर्यचकित झाले. एक्स रे रिपोर्टमध्ये एक पांढरी लाइन दिसत होती. याचाच अर्थ, परेश रावल यांची दुखापत बरी झाली होती. दुखापत बरी व्हायला साधारणः दोन-अडीच महिने लागतात. पण वीरु देवगण यांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे ही दुखापत दीड महिन्यातच बरी झाली", असं परेश रावल म्हणाले होते.