लग्न केले नसल्याचा आनंद मानणारी आशा पारेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 15:21 IST2017-02-25T09:51:47+5:302017-02-25T15:21:47+5:30

बॉलिवूडमध्ये कित्येकांचे संबंध येतात आणि मोडले जातात. ब्रेकअप ही जणू प्रत्येकाची टॅगलाईन झाली असावी अशी स्थिती आहे. अशावेळी लग्न ...

Parekh hopes that he is not married | लग्न केले नसल्याचा आनंद मानणारी आशा पारेख

लग्न केले नसल्याचा आनंद मानणारी आशा पारेख

लिवूडमध्ये कित्येकांचे संबंध येतात आणि मोडले जातात. ब्रेकअप ही जणू प्रत्येकाची टॅगलाईन झाली असावी अशी स्थिती आहे. अशावेळी लग्न केले नाही याचा आनंद असल्याचे बॉलिवूडच्या नामांकित अभिनेत्री आशा पारेख सांगतात, त्यावेळी त्यांचे वेगळेपण जाणवते. कदाचित माझ्या नशिबातच लग्न नसावे. मी ज्यावेळी पालक आणि मुलांमधील संघर्ष पाहते, त्यावेळी लग्न न केल्याचे समाधान वाटते, असेही त्यांना वाटले. त्यांच्या आयुष्याच्या या वेगळ्या कहाणीविषयी...



आसमान (१९५२) पासून आशा यांनी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली. एका स्टेजवर डान्स करताना बिमल राय यांनी आशा यांना पाहिले आणि त्यांना चित्रपटात घेतले. वयाच्या १२ व्या वर्षी बाप बेटी (१९५४) या चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्या शाळेत जात होत्या. गुंज उठी शहनाई चित्रपटासाठी विजय भट्ट यांनी त्यांना नाकारले होते. त्यांच्यात स्टारपदाची काहीही लक्षणे दिसत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते.  



सतराव्या वर्षी त्यांनी पुन्हा कामास सुरूवात केली. निर्माता सुबोध मुखर्जी आणि दिग्दर्शन नासिर हुसेन यांनी दिल देके देखो (१९५९) मध्ये हिरोईन म्हणून काम केले. शम्मी कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे त्या रातोरात स्टार झाल्या.
नासिर हुसेन यांनी त्यानंतर जब प्यार किसी से होता है (१९६१), फिर वोही दिल लाया हुँ (१९६३), तिसरी मंझील (१९६६), बहारों के सपने (१९६७), प्यार का मौसम (१९६९), कारवाँ (१९७१) हे सलग चित्रपट त्यांनी केले. चित्रपटांच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये २१ वर्षे हुसेन यांनी आशा पारेख यांना सोबत घेतले.



राज खोसला यांनी वेगळ्या भूमिका देईपर्यंत त्यांनी रोमँटिक चित्रपटात काम केले. दो बदन (१९६६), चिराग (१९६९), मै तुलसी तेरे आंगन की (१९७८), पगला कहीं का (१९७०), कटी पतंग (१९७०), कन्यादान (१९६८), प्यार का मौसम (१९६९), आये दिन बहार के (१९६६), आया सावन झुम के (१९६९), मेरा गाँव मेरा देश (१९७१), समाधी (१९७२), आन मिलो सजना, धरम और कानून अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केले. १९९५ पासून त्यांनी चित्रपटात काम करणे थांबविले. 



काम करताना त्यांचा मेकअप आर्टिस्ट आला नसल्यामुळे गीता बाली या शम्मी कपूर यांच्या पत्नी त्यांचा मेकअप करीत. एकदा त्या शम्मींना म्हणाल्या, ‘आपण या मुलीला दत्तक घेऊयात का?’ यामुळे आशा पारेख शम्मी कपूर यांना चाचाजी म्हणत. 



आशा पारेख शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या. मात्र त्यांचे दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्यासोबत अनेक वर्षे त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे अफवा होती. आशा पारेख एकदा म्हणाल्या होत्या की त्यांचा अनेक वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड आहे मात्र काही संबंध असल्याचे त्यांनी नाकारले होते. एकदा त्या म्हणाल्या होत्या, नासिर हुसेन यांना त्यांनी अनेक वर्षांपासून पाहिले नव्हते. पत्नींच्या मृत्यूनंतर ते बाहेर पडले नव्हते. २००२ साली हुसेन यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्याशी त्यांचे बोलणे असायचे.


एकटे राहण्याचे दु:ख नाही. मला अनेक मित्र आहेत, त्यांच्याशी मी बोलत असते. जर तुमच्या नशिबात लग्न नसेल तर तुमचा सहकारी तुम्हाला सोडून जाईल किंवा मृत्यू होईल आणि तुम्ही पुन्हा एकटे राहील.’ असे आशा पारेख यांचे म्हणणे होते.


Web Title: Parekh hopes that he is not married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.