पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 04:38 PM2023-11-09T16:38:06+5:302023-11-09T16:48:26+5:30

अभिनेते पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. 

Pankaj Tripathi's first look from 'Kadak Singh' is out | पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर

पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर

‘मिर्झापूर’ फेम ‘कालिन भैया’ अर्थात अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठी हे आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा स्वतंत्र असा एक मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच सुपरस्टार अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे पहिलं पोस्टर समोर आलं आहे. 

OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'कडक सिंग'चे हे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहले की, "अनेक गोष्टी पण एकच सत्य, खोटेपणाच्या पडद्यापलीकडे पाहण्यात कडक सिंह यशस्वी होईल का?. या पोस्टरवरून पंकज त्रिपाठी यांचा कडक सिंग हा एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे याचा अंदाज बांधता जातोय.

 'कडक सिंह' चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून ज्याचे नाव एके श्रीवास्तव आहे. या चित्रपटात पंकज घोटाळे उघड करताना दिसणार आहे. 'कडक सिंह' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

पंकज त्रिपाठी प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाची छान छाप सोडतात. पंकज त्रिपाठीला चित्रपटात पाहायला चाहत्यांना आवडते, मग तो साइड रोलमध्ये असो किंवा मुख्य भूमिकेत, चाहत्यांना त्यांना चित्रपटात पाहायला आवडते.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते पंकज त्रिपाठी यांनी सेक्रेड गेम’ आणि ‘मिर्झापूर’सारख्या वेब सीरिजदेखील त्यांनी गाजवल्या आहेत. तर आगामी 'मैं अटल हूं' चित्रपटामध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय, ते 'मेट्रो इन डिनो' आणि 'स्त्री २' या चित्रपटातही ते दिसणार आहेत. 
 

Web Title: Pankaj Tripathi's first look from 'Kadak Singh' is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.