Main Atal Hoon : मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:45 AM2022-12-25T11:45:13+5:302022-12-25T11:47:55+5:30

Main Atal Hoon : होय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे.

pankaj tripathi will play the role of atal bihari vajpayee Main Atal Hoon first look | Main Atal Hoon : मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!

Main Atal Hoon : मैं अटल हूं!  पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!

googlenewsNext

संयमी, शांत आणि अभ्यासू राजकारणी, संवेदनशील कवी अशी ओळख असलेले देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee ) यांची आज 98 वी जयंती. जयंतीदिनी अख्खा देश त्यांचं स्मरण करतोय. अशात निमित्ताने ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला आहे.
होय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

पंकज त्रिपाठी यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या. आपल्या अनोख्या अंदाजाने त्यांनी प्रत्येक भूमिकेला चार चांद लावले. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली. लवकरच ते अटलजींची भूमिका जिवंत करणार आहेत.  नुकतंच या चित्रपटाचं नाव जाहीर झालं होतं. आज  अटलजींच्या जयंती निमित्त या चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपातील फर्स्ट लुक समोर आला आहे.

पंकज त्रिपाठी यांनी एक व्हिडीओ शेअर करत, ‘मैं अटल हूं’चा फर्स्ट लुक दाखवला आहे. ‘अटलजींची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी मला संयमपूर्ण माझ्या व्यक्तिमत्त्वावर काम करण्याची गरज आहे. मी या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेल हा अटल विश्वास मला आहे,’ असं त्यांनी या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

‘मैं अटल हूं’ हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठींनी प्रचंड मेहनत केली. या भूमिकेसाठी त्यांनी अनेक महिने अभ्यास केला. पंकज त्रिपाठींना अटलजींचा लुक देण्यासाठी प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेण्यात आली.

Web Title: pankaj tripathi will play the role of atal bihari vajpayee Main Atal Hoon first look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.