पंकज त्रिपाठी एक वर्ष चित्रपटांपासून दूर का राहिले? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण, म्हणाले-"या धावपळीत…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:10 IST2026-02-10T10:08:57+5:302026-02-10T10:10:38+5:30

अभिनयातून का घेतला ब्रेक? पंकज त्रिपाठींनी सांगितलं कारण, म्हणाले...

pankaj tripathi reveals the reason to stay away from industry for one year says | पंकज त्रिपाठी एक वर्ष चित्रपटांपासून दूर का राहिले? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण, म्हणाले-"या धावपळीत…"

पंकज त्रिपाठी एक वर्ष चित्रपटांपासून दूर का राहिले? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण, म्हणाले-"या धावपळीत…"

Pankaj Tripathi : बॉलिवूडमधील संघर्षाचा काळ पाहून काहीजण हार मानून माघारी फिरतात, तर काही कलाकार असे आहेत जे या यशाची वर्षानुवर्षे वाट पाहतात,अशाच बहुगुणसंपन्न कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे पंकज त्रिपाठी. पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून केली. सध्या वेबसिरीज, चित्रपटातून गाजणाऱ्या जयदीपचा बॉलिवूडमधील प्रवास मात्र अजिबात सोपा नाही. ‘मिर्झापूर’ सारखी वेबसिरीज तसेच ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘स्त्री-२’  या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे सर्वच चाहते झाले. मात्र, अचानक अभिनेत्याने गेल्या वर्षी इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज त्रिपाठींनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्यांनी ‘वैरायटी इंडिया’ही मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. यावेळी पंकज त्रिपाठी म्हणाले की, "मी सतत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी काम करत होतो. त्यामुळे या धावपळीत थकवा येत होता. मला माझ्या कामाचा आनंद मिळत नव्हता. त्यासाठी ब्रेक घेणं खूप गरजेचं होतं. आता मी कोणताही प्रोजेक्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेतो. जर मला खरंच काम करून आनंद मिळणार असेल तर तेव्हाच मी घराबाहेर पडतो." अभिनेत्याचं हे विधान चांगलच चर्चेत आलं आहे.

यापुढे मुलाखतीत ते म्हणाले,"मी आयुष्याच्या अशा टप्प्यात आहे जिथे माझ्यासाठी समाधान महत्त्वाचं आहे. त्यावेळी गरज नसतानाही मी खूप काम करत आहे असं मला वाटत होतं. केवळ ईएमआय भरण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मी अभिनय करू शकत नाहीत. मला आता हे असंच पुढे चालू ठेवायचं आहे आणि ते दीर्घकाळात माझ्यासाठी किती फायदेशीर आहे हे पाहायचंय. अशी प्रतिक्रिया पंकज त्रिपाठींनी दिली. 

यादरम्यान, मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी म्हणाले,"आता मला असे चित्रपट करायचे आहेत जे मनोरंजनाचे फुल टू पॅकेज असतील.भारतात लोक मनोरंजनासाठी चित्रपट पाहतात, म्हणूनच मनोरंजनसाठी कर आहे. परंतु, या चित्रपटांमधून एक संदेश, माहिती लोकापर्यंत पोहचणं गरजेचं आहे."

Web Title : पंकज त्रिपाठी ने फिल्मों से ब्रेक क्यों लिया: कारण

Web Summary : पंकज त्रिपाठी ने बताया कि उन्होंने थकान और काम में खुशी की कमी के कारण फिल्मों से ब्रेक लिया। वह केवल जीवन यापन के लिए नहीं, बल्कि सार्थक भूमिकाएँ चाहते हैं और संदेश के साथ मनोरंजन प्रदान करने वाली परियोजनाएँ चाहते हैं।

Web Title : Why Pankaj Tripathi took a break from films: The reason

Web Summary : Pankaj Tripathi revealed he took a break from films due to exhaustion and a lack of joy in his work. He wants meaningful roles, not just for survival, and seeks projects offering entertainment with a message.