पंकज त्रिपाठींच्या घरी आनंदाचे वातावरण, पत्नी मृदुला आणि नवजात बाळासोबतचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:10 IST2025-06-05T15:10:20+5:302025-06-05T15:10:27+5:30

पंकज त्रिपाठी आणि त्याची पत्नी मृदुला यांचा एका चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pankaj Tripathi Holds Paritosh Tripathi Newborn Baby In Arms Wife Mridula Showers Love Adorable Photo Viral | पंकज त्रिपाठींच्या घरी आनंदाचे वातावरण, पत्नी मृदुला आणि नवजात बाळासोबतचा फोटो व्हायरल

पंकज त्रिपाठींच्या घरी आनंदाचे वातावरण, पत्नी मृदुला आणि नवजात बाळासोबतचा फोटो व्हायरल

Pankaj Tripathi With Newborn Baby: बॉलिवूडमधील बहुआयामी अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठींना ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजपर्यंत पंकज त्रिपाठी यांनी निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. सुपरस्टार पंकज त्रिपाठी हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे जितके चर्चेत असतात, तितकेच ते त्यांचं खासगी आयुष्य कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं पसंत करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

पंकज त्रिपाठी आणि त्याची पत्नी मृदुला यांचा एका चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोत दिसतंय की, पंकज त्रिपाठी यांनी बाळाला हातात घेतलं आहे. तर, पत्नी मृदुला त्यांच्या बाजूला बसल्या असून दोघांच्या डोळ्यांत बाळासाठी असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसून येतंय. पंकज त्रिपाठी आणि मृदुला हे आई-बाबा नाहीतर काका आणि काकू बनले आहेत. 


पंकज त्रिपाठींचा ज्या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो व्हायरल होतोय, ते बाळ अभिनेता परितोष त्रिपाठीचं आहे. परितोष आणि त्याची पत्नी मीनाक्षी चंद यांनी २३ मे रोजी त्यांच्या मुलीचं स्वागत केलंय. परितोष हादेखील उत्तम अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने 'द कपिल शर्मा शो', 'लुडो', 'जनहित में जरी' आणि 'केस तो बनता है' यांसारख्या अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो 'सुपर डान्सर' या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक म्हणूनही ओळखला जातो. 


पंकज त्रिपाठींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्यांची 'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. 'क्रिमिनस जस्टिस ४' या सिजनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी अ‍ॅडव्होकेट माधव मिश्रा यांची भूमिका साकारली आहे. या सिरीजमध्ये कोर्टरूम ड्रामा, कौटुंबिक संघर्ष आणि गुन्हेगारी तपास यांचं उत्कृष्ट चित्रण पाहायला मिळतंय. याशिवाय ते आता लवकरच अनुराग बसू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहेत.  या चित्रपटात अनुपम खेर, कोंकणा सेन शर्मा, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अली फजल, नीना गुप्ता आणि सास्वता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pankaj Tripathi Holds Paritosh Tripathi Newborn Baby In Arms Wife Mridula Showers Love Adorable Photo Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.