​ pali hill property case : दिलीप कुमार यांना बिल्डरला द्यावे लागणार २० कोटी; वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 14:45 IST2017-08-31T09:10:20+5:302017-08-31T14:45:15+5:30

मुंबईतील पाली हिल बंगला वादाप्रकरणी बिल्डरला आंशिक मोबदल्यापोटी २० कोटी रूपयांची रक्कम  रजिस्ट्रारकडे जमा करा, असे आदेश  सुप्रीम कोर्टाने ...

Pali hill property case: Dilip Kumar needs to give 20 crore to builder; Read what the episode! | ​ pali hill property case : दिलीप कुमार यांना बिल्डरला द्यावे लागणार २० कोटी; वाचा काय आहे प्रकरण!

​ pali hill property case : दिलीप कुमार यांना बिल्डरला द्यावे लागणार २० कोटी; वाचा काय आहे प्रकरण!

ंबईतील पाली हिल बंगला वादाप्रकरणी बिल्डरला आंशिक मोबदल्यापोटी २० कोटी रूपयांची रक्कम  रजिस्ट्रारकडे जमा करा, असे आदेश  सुप्रीम कोर्टाने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना दिले आहेत. दिलीप कुमार यांनी चार आठवड्यात ही रक्कम जमा करावी,असेही कोर्टाने म्हटले आहे. ही रक्कम जमा केल्यानंतर रिअल इस्टेट फर्मने बंगल्याबाहेर तैनात सुरक्षाकर्मचारी हटवावेत आणि सात दिवसांच्या आत मुंबई पोलिस कमिशनरच्या उपस्थितीत दिलीप कुमार यांना बंगला सोपवावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. या वादात रिअल इस्टेट फर्मला किती मोबदला मिळायला हवा, याच्या आकलनासाठी सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पी. व्यंकटरामा रेड्डी यांना मध्यस्थ नियुक्त करण्यात आले आहे. रिअल इस्टेट फर्म यांना २० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळायला हवी का? हे ते निश्चित करतील.

प्रसिद्ध चित्रपट कलावंत दिलीपकुमार यांचा पाली हिल्स येथे इतर चित्रपट कलावंतांच्या रांगेतच आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे शंभर कोटी असल्याचे सांगितले जाते. १९५३ मध्ये दिलीपकुमार यांनी हा बंगला किरायाने घेतला होता. या बंगल्याच्या बांधकामात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी अट घरमालक खटाऊ यांनी घातली होती. मात्र, दरम्यानच्या काळात खटाऊ यांनी हा बंगला नारायण भोजवानी यांना विकला. काही वर्षांपूर्वी दिलीपकुमार यांनी पालिकेकडे या बंगल्याच्या बांधकामात काही बदल करण्याची परवानगी मागितली होती, हा बंगला सहामजली करण्यासाठी त्यांनी संबंधित बिल्डरसोबत करारही केला होता. मात्र,बिल्डरने कुठलेच काम केले नाही. त्यामुळे दिलीप कुमार यांनी हा बंगला बिल्डरकडून परत मागितला होता. पण बिल्डरने यास नकार दिल्याने हा वाद कोर्टात पोहोचला होता.

Web Title: Pali hill property case: Dilip Kumar needs to give 20 crore to builder; Read what the episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.