"सिनेमा बनवतो म्हणत ४० लाख घेतले", स्मृती मानधनाच्या मित्राचे आरोप, पलाश मुच्छल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:39 IST2026-01-23T15:39:26+5:302026-01-23T15:39:52+5:30
सिनेमाच्या नावाखाली पलाशने तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप ३४ वर्षीय अभिनेता आणि निर्माता असलेल्या विज्ञान मानेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पलाशने अखेर मौन सोडलं आहे.

"सिनेमा बनवतो म्हणत ४० लाख घेतले", स्मृती मानधनाच्या मित्राचे आरोप, पलाश मुच्छल म्हणाला...
भारताची क्रिकेटर स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर आता बॉलिवूड सिंगर पलाश मुच्छलवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. सिनेमाच्या नावाखाली पलाशने तब्बल ४० लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप ३४ वर्षीय अभिनेता आणि निर्माता असलेल्या विज्ञान मानेने केला आहे. याप्रकरणी अभिनेत्याने सांगली पोलिसांत पलाशविरोधात तक्रारही दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पलाशने अखेर मौन सोडलं आहे. पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
पलाश मुच्छलचं स्पष्टीकरण
"मी सांगू इच्छितो की सांगलीच्या विज्ञान मानेने याने सोशल मीडियावर माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून त्यात कोणतंही तथ्य नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माझे वकील श्रेयांश मिथरे यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील", असं पलाशने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
पलाश मुच्छलेन सिनेमाच्या नावाखाली ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप सांगलीच्या विज्ञान माने याने केला आहे. २०२४ मध्ये स्मृतीमुळे पलाश आणि विज्ञान यांची भेट झाली होती. एक सिनेमा बनवतो असं सांगून पलाशने ४० लाख रुपये घेतले. सहा महिन्यात सिनेमा पूर्ण झाल्यावर नफ्यासहित पैसे करणार असंही पलाश बोलल्याचं विज्ञानने सांगितलं. पण, सिनेमाचं शूटिंग सुरू झालं नाही आणि पलाशने पैसेही परत केले नाहीत. स्मृतीसोबत लग्न झाल्यानंतर पैसे परत करतो असं पलाशने सांगितल्याचा खुलासाही विज्ञानने केला. पण, लग्न मोडल्यानंतर पलाशने फोन उचलणंही बंद केलं. याशिवाय त्याच्या आईने सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचंही विज्ञानने म्हटलं आहे.