पलक तिवारी श्वेताला म्हणते 'देसी आंटी', अभिनेत्रीची लेक म्हणाली - एकेक पैशांचा मागते हिशोब...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:37 PM2023-05-19T13:37:43+5:302023-05-19T13:39:15+5:30

Palak Tiwari and Shweta Tiwari : पलक तिवारीने अलीकडेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Palak Tiwari calls Shweta 'Desi Aunty', actress's daughter says - Demands account of every penny... | पलक तिवारी श्वेताला म्हणते 'देसी आंटी', अभिनेत्रीची लेक म्हणाली - एकेक पैशांचा मागते हिशोब...

पलक तिवारी श्वेताला म्हणते 'देसी आंटी', अभिनेत्रीची लेक म्हणाली - एकेक पैशांचा मागते हिशोब...

googlenewsNext

पलक तिवारी(Palak Tiwari)ने अलीकडेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील तिच्या स्टाईल आणि लूकचे खूप कौतुक झाले आहे. पलक खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. पलक तिवारी ही सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ची मुलगी आहे. आई आणि मुलगी दोघांमध्ये खूप गोड नातं आहे. पलक अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये तिची आई श्वेता तिवारीबद्दल बोलत असते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने आईबद्दल अनेक खुलासे केले.

पलक तिवारीने तिच्या आईबद्दल सांगितले की, ती नेहमीच तिला सपोर्ट करते. कोणत्याही गोष्टीसाठी टोकत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे पलकने तिच्या आईला कूल म्हटले आहे. पण त्याच वेळी ती आईला देसी आंटी पण म्हणाली. वास्तविक, पलक सांगते की, आईकडे २० रुपये मागण्यासाठीही खूप विचार करावा लागतो. ती पुढे म्हणते २० रुपये सोडा, मला स्वतःचे पैसे खर्च करण्यापूर्वी आईची परवानगी घ्यावी लागते.

OTP देण्यापूर्वी करते हजार प्रश्न

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, 'जर मला माझ्या स्वतःच्या कार्डमधून पैसे खर्च करायचे असतील तर त्याचा ओटीपी माझ्या आईकडे जातो. ज्यासाठी मी आईला OTP साठी कॉल करते. OTP देण्यापूर्वी ती हजार प्रश्न विचारते की तुम्ही पैसे कुठे खर्च करत आहेस? पैसा झाडांवर वाढतो का? एवढ्या वेळात ओटीपी एक्सपायर होतो आणि जेव्हा मी माझ्या आईला दुसऱ्यांदा ओटीपीसाठी कॉल करते तेव्हा ती म्हणते की मी शूटिंगवर आहे. मला त्रास देऊ नकोस.

Web Title: Palak Tiwari calls Shweta 'Desi Aunty', actress's daughter says - Demands account of every penny...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.