"स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे...", लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशच्या बहिणीची प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:32 IST2025-11-25T10:25:03+5:302025-11-25T10:32:57+5:30
स्मृती मंधाना अन् पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकळलं, कारण...; अखेर बहिणीने खरं काय ते सांगितलंच

"स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे...", लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशच्या बहिणीची प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली...
Palak Mucchal Post: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबरला होणार होता. सांगलीमध्ये हा विवाहसोहळ रंगणार होता. मात्र, ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.त्यामुळे स्मृती-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकळण्यात आला आहे. यातून सावरत नाही तोच स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याचीही तब्येत बिघडली. दरम्यान, त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.अशातच यावर आता पलाश मुच्छलची बहिण प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या लग्नाचे विधी मोठ्या दिमाखात सुरु होते. रविवारी त्यांचा लग्नसोहळा होता. पण, लग्नाला काही अवधीच शिल्लक असताना स्मृतीच्या वडिलांना त्रास जाणवू लागला.त्यामुळे स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याबाबत पलाशची बहिण गायिका पलक मुच्छलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलंय,"स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे, स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकळण्यात आलं आहे. या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबांच्या खाजगी आयुष्याचा आदर करण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो." अशा आशयाची स्टोरी तिने शेअर केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,स्मृती मंदानाच्या वडिलांनंतर पलाशचीही तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर स्मृतीच्या मॅनेजरने लग्नसोहळा तात्पुरता रद्द झाल्याचं जाहीर केलं. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पलाश मुच्छलला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि अॅसिडिटीची झाली होती. वृत्तानुसार, त्यांची प्रकृती गंभीर नाही. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते हॉटेलमध्ये सुखरुप परतले आहेत.