पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 13:45 IST2016-07-16T08:12:21+5:302016-07-16T13:45:19+5:30

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अन् वादाशी जणू काही स्वत:हून नाते जुळवून घेणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिची भाऊ ...

Pakistani model Kandil Baloch shot and killed | पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची गोळ्या झाडून हत्या

शल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अन् वादाशी जणू काही स्वत:हून नाते जुळवून घेणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिची भाऊ गफूर याने मुल्तान येथील राहत्या घरात गोळ्या झाडून हत्त्या केली आहे. 
सुत्रानुसार गफूर कंदीलला भेटण्यासाठी घरी आला होता. त्या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. या रागातून त्याने सुरुवातीला गळा दाबूून अन् नंतर गोळ्या झाडून तिची हत्त्या केली. कंदील गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत होती. नुकताच तिने ट्विटरवर ‘बॅन’ नावाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमर अवतारात दिसत होती. यामुळे पाकिस्तानात वादही निर्माण झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यात कंदीलने पाकिस्तानचे प्रसिद्ध मौलवी मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबतची सेल्फी शेअर करून आणखीनच वाद निर्माण केला होता. या सेल्फीमुळे मौलवी यांना सरकारी समितीतून निलंबित देखील करण्यात आले होते. तसेच धार्मिक स्तरातून देखील मौलवी आणि कंदीलवर टीका करण्यात आली होती. या संपुर्ण प्रकरणांमुळे भाऊ गफूरने तिला इंटरनेटवर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करू नये अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर तिने पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली होती. 
दरम्यान कंदील खºया अर्थाने तेव्हा चर्चेत आली जेव्हा टि-२० वर्ल्ड कप  दरम्यान तिने स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्याप्रतीचे प्रेम जगजाहिर केले होते. यावेळी तिने ट्विटरवर विराटला ‘बेबी, अनुष्का शर्मा ही क्यू?’ असा प्रश्न उपस्थित करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. 

Web Title: Pakistani model Kandil Baloch shot and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.