​आमिर खानच्या ‘दंगल’चा पाकिस्तानी अवतार; तेथेही सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 21:57 IST2017-02-24T16:26:26+5:302017-02-24T21:57:46+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अनेक विक्रम करीत नवा इतिहास रचला ...

Pakistani incarnation of Aamir Khan's 'riot'; There too superhit | ​आमिर खानच्या ‘दंगल’चा पाकिस्तानी अवतार; तेथेही सुपरहिट

​आमिर खानच्या ‘दंगल’चा पाकिस्तानी अवतार; तेथेही सुपरहिट

लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अनेक विक्रम करीत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाची भूरळ कोणत्याही चित्रपटसृष्टीला पडणे स्वाभाविकच आहे. ‘दंगल’चा फ ॉम्युला घेऊन पाकिस्तानातील काही कलावंतांनी या चित्रपटाचे नाटकीय रुपांतर केले आहे. 

भारतात सुपरहिट ठरलेला ‘दंगल’ हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होऊ शकला नाही. मात्र या चित्रपटाचा सुपरहिट फॉम्युला घेऊन लाहोरच्या नाट्यनिर्मात्यानी एका महिन्यात दंगलच्या स्क्रिप्टचा आधार घेत एका नाटकाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे नावही त्यांनी ‘दंगल’ असेच ठेवले आहे. पाकिस्तानातही हे नाटक सुपरहिट ठरल्याने याची चर्चा आता सुरू झाली आहे. या नाटकाचे शो पाकिस्तानात हाऊसफुल्ल ठरले आहेत, असल्याचे वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिले आहे. 



पाकिस्तानी ‘दंगल’चे पोस्टरमध्येही आमिर खानच्या दंगलच्या पोस्टरची जशीच्या तशी कॉपी करण्यात आली आहे. पाकिस्तानी दंगलच्या नाट्य रुपांतरात आमिरने साकारलेली महावीर सिंग फोगट ची भूमिका स्थानिक कलावंत नसीम विक्की साकारत आहे, त्याने आमिरचा महावीर सिंग सारखा लूक केला आहे.  या नाटकात साबिया खान महावीर सिंग फोगटच्या पत्नीच्या रूपात, सिदरा नूर, महक नूर, निशा भट्टी आणि निगार चौधरी यांनी महावीर सिंगच्या मुलीच्या भूमिका केल्या आहेत. आजतकने आपल्या संकेतस्थळावर या पाकिस्तानी दंगलमध्ये नन्हे सरताज याने गायलेल्या ‘हानीकारक बापू’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ या चित्रपटाने  बॉक्स आॅफिसवर ३८० कोटीहून अधिक कमाई केली होती. ३५० कोटीहून अधिक कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट असण्याचा मान दंगलने मिळविला आहे. दंगल या चित्रपटाची शूटिंग तब्बल दोन वर्षे चालली. यासाठी आमिर खानने आपले वजन ९० किलोपर्यंत वाढविले होते. 

http://aajtak.intoday.in/embed/7dc087d/

Web Title: Pakistani incarnation of Aamir Khan's 'riot'; There too superhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.