'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, सीक्वलसाठी बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:31 IST2025-02-19T16:30:39+5:302025-02-19T16:31:56+5:30
Sanam Teri Kasam Movie : 'सनम तेरी कसम' हा चित्रपट २०१६ मध्ये पहिल्यांदाच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. पण आता ९ वर्षांनंतर, त्याच्या री-रिलीजमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे.

'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, सीक्वलसाठी बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाची होतेय चर्चा
'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा चित्रपट २०१६ मध्ये पहिल्यांदाच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन (Mawra Hocane) यांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. पण आता ९ वर्षांनंतर, त्याच्या री-रिलीजमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे आणि जबरदस्त कलेक्शन करून सर्वांना चकित केले. दरम्यान, सनम तेरी कसमच्या सीक्वलबाबतही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव चित्रपटाच्या सीक्वलमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून चर्चेत आले आहे.
सनम तेरी कसममधील पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनेच्या सरस्वती उर्फ सरू या पात्राने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. री-रिलीजमध्ये तिच्या चित्रपटाच्या यशाबद्दल मावरा खूप आनंदी झाली आणि नुकत्याच एका मीडिया मुलाखतीदरम्यान तिने या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तिला सनम तेरी कसम २ मधून बाहेर राहावे लागेल असे दिसते. खरेतर नुकतीच सनम तेरी कसम दिग्दर्शक जोडी विनय सप्रू आणि राधिका राव यांनी इन्स्टंट बॉलिवूडला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये चाहत्यांनी त्यांना सनम तेरी कसम २ साठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव सुचवले. ज्यावर राधिका आणि विनय सहमत असल्याचे दिसले आणि त्यांनी श्रद्धाला टॅग करण्याबाबतही बोलले.
'सनम तेरी कसम २'ची घोषणा
श्रद्धा कपूर सनम तेरी कसम २ चा भाग असेल हे अद्याप अधिकृतपणे ठरलेले नाही. पण असे झाले तर हर्षवर्धन राणेंसोबत तिची जोडी चमत्कार घडवू शकते. सनम तेरी कसम २ची घोषणा निर्मात्यांनी आधीच केली आहे. ७ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीक लक्षात घेऊन सनम तेरी कसम चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. तेव्हापासून आतापर्यंत हा सिनेमा रिलीज होऊन तब्बल १२ दिवस उलटले आहेत. कमाईच्या बाबतीत, या रोमँटिक थ्रिलरने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. या चित्रपटाच्या नेट बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर, सनम तेरी कसमने त्याच्या रि-रिलीजमध्ये आतापर्यंत सुमारे ३८ कोटींचा व्यवसाय केला आहे.