"ना दिसायला चांगला, अन् अभिनयही येत नाही..", पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानवर केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:32 PM2023-07-08T12:32:35+5:302023-07-08T12:44:47+5:30

पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानच्या अभिनय कौशल्यावर आणि त्याच्या लुक्सवर कमेंट केली आहे.

Pakistani actress mahnoor baloch says shah rukh khan does not know acting and not handsome | "ना दिसायला चांगला, अन् अभिनयही येत नाही..", पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानवर केली कमेंट

"ना दिसायला चांगला, अन् अभिनयही येत नाही..", पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानवर केली कमेंट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान  (Shah Rukh Khan)कोणत्याही परिचयाची गरज नाही. देशासह विदेशातही त्याची तुफान क्रेझ आहे. त्याचे जगभरात चाहते आहेत. पण अलीकडेच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानच्या अभिनय कौशल्याबद्दल आणि त्याच्या लुक्सवर कमेंट केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोच तिच्या कमेंटमुळे चर्चेत आली आहे.जाणून घेऊया महनूर बलोचने शाहरुख खानबद्दल काय कमेंट केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने पाकिस्तानी टॉक शो 'हद करदी'मध्ये शाहरुख खानच्या अभिनयाला घेऊन कमेंट केली आहे. इतकंच नाही तर शाहरुख चांगला बिझनेसमन आहे आणि त्याला स्वत:चं मार्केटिंग कसं करायचं हे त्याला माहीत असल्याचंही महनूर म्हणाला. ती म्हणाला, "शाहरुख खानचे व्यक्तिमत्त्व खूप चांगले आहे, पण तो हँडसम नाहीय. फक्त त्याच्या पर्सनालिटीमुळे तो चांगला दिसतो. 


महनूर बलोच पुढे म्हणाली, "मला असं वाटतं की, शाहरुख खानला अभिनय येत नाही. तो एक चांगला बिझनेसमन आहे आणि त्याला स्वतःचे मार्केटिंग कसे करावे हे नीट माहित आहे. कदाचित त्याचे चाहते माझ्या मताशी सहमत नसतील, पण हरकत नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व चांगले आहे, तो स्वत:चे चांगले मार्केटिंग करतो. पण इतरही अनेक चांगले कलाकार आहेत, जे त्याच्याइतके यशस्वी नाहीत." महनूरच्या शाहरुख खानबद्दलच्या या कमेंटनंतर चाहत्यांना तिचा राग आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक महनूरला ट्रोल करत आहेत. काही लोक महनूर शाहरुख खानचे नाव घेऊन लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हणतायेत.

Web Title: Pakistani actress mahnoor baloch says shah rukh khan does not know acting and not handsome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.